पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बाप

"मखमलीच्या पेटीत दोनच अक्षर मावतात ती म्हणजे आई" हा सुविचार आपला सर्वांचा आवडता आणि परिचयादेखील.. माझी आई अशी , माझी आई तशी सार काही आईच कौतुक.... आपल्या जन्मासोबत देव आपल्याला दोन कायमस्वरुपाच्या भेटवस्तू देतो... एक आपली आई आणि दुसरे म्हणजे बाबा... आई जी आपल्याला जन्म देते... तिच आणि आपल नात जन्माच्या आधी पासुनच.. आणि बाप आपल आयुष्यभर रक्षण करतो आपल्या सुखासाठी स्वत: चटके सोसतात.... मग मखमलीच्या त्या पेटीत बाबा ही दोन अक्षर का नाहीत...???

नेहमीच आपल्याला बापापेक्षा आई जवळ ची असते.. आई च प्रेम आपल्याला लगेच कळून येत.. तसच बापा चा ओरडा ही कळतो मात्र त्या मागच प्रेम मात्र नजरेआड होत... आपल्या सुखकर भविष्यासाठी त्या बिच्चार्यान खाल्लेल्या खस्ता कशा काय विसरतो आपण... आपल्याला चांगले वळण लागावे म्हणून तो आपल्याला ओरडत असतो तेव्हा मात्र आपल्याला त्याची काळजी बंधन वाटत असत... त्यांनी काळजी ने फोन जरी केला तरी आपल्याला ती कटकट वाटू लागते... आपला आवाज ऐकता यावा म्हणून स्वत: सोबत तो आपल्या सुद्धा फोन मध्ये बॅलेन्स भरतो.... लव्ह मॅरेज करताना त्याच ओरडण रागावण लगेच दिसत मात्र त्यामागची त्याची काळजी का नाही कळत आपल्याला...??? त्यान कमवलेला पैसा बिनहिशोबी उडवताना आपल्याला काही च नाही वाटत पण त्याच्या वर खर्च करण्याची वेळ आली की का आपण हात अखडता घेतो...???
मुलगा पास झाल्यानंतर त्याची द्रुष्ट काढणारी आई लगेच लक्षात येते पण चोरुन पेढाचा पुडा आणनारा बापाला मात्र आपण विसरतो... मुल वयात येताना त्याच्या मनावर आपोआप दडपण यायला सुरु होत... आपल पाऊल चुकीच पडल तर सगळ्यात आधि तो खचतो... मग त्याच दडपण ह्या ना त्या आजराच्या रुपात बाहेर पडत.. लेकीच्या लग्नासाठी दारोदार भटकतो, लोकांच्या घराचे उंबरे झिजवतो.... तरी ही लेकीच्या लग्नात पाठवणीच्या वेळी रडणारी आईला सावरायला सगळेच जातात... पण कोपर्यात जाऊन हळुच रुमालाने डोळे टिपणारा बाप आम्हाला दिसतच नाही...
आपण कदाचित हे विसरलो आहोत की बाप असला तरी तो एक माणूस आहे...त्याला देखील ह्रदय आहे, भावना आहेत पण थोड़ा कठोर असल्याने आपण त्याला दगड च समजतो..... जेवणात तिखट मिठ गरजेच असत तर मग आयुष्यात का नाही..??? आपल्या आयुष्यरुपी जेवणात तिखट मिठाच काम बाप करत असतो मग आपण ते कस काय डावलू शकतो..???
आपण शाळा कॅालेजात जातो आपल्या आवडीचे मित्र बनवतो, लग्न करताना आपल्या आवडीचा जोडीदार निवडतो.... पण आई बाबा आपल्याला आवडीचे व निवडून नाही ना घेता येत... ते जे असतील जसे असतील तसे स्विकारावे लागतात.... तरी समजून घेतो का आपण...???? आपल्याला देवाने दिलेल्या देणगी ला जपतो का...????
आपल्याला चांगले कपडे घालयला मिळावेत म्हणून तो काटकसर करतो... स्वत: खर्च करताना शंभर वेळा विचार करणारा बाप आपल्यावर मात्र हाजारो रुपये पाण्यासारख खर्च करतो.... त्याची स्वप्न आपल्यावरती च सुरु होतात आणि आपल्यावरती च तर थांबतात..... कधीतरी आपण त्याला समजून घेतो का..??? आपल्या स्वप्नांसाठी स्वत:ची स्वप्न त्यागणार्या बापाची स्वप्न काय आहेत हे तरी आपण जाणून घेतो का..??
बाप कधी रडत नाही, मनातल दुख: मनातच साठवून ठेवतो आणि याच दुखा:च कटुत्व रोज थोड थोड तो पित असतो... मनात किती ही दुख: असल तरी चेहर्यावर जस काही झाल च नाही असे भाव आणून जगण त्याला कस काय जमत त्याला च माहीत.... त्याचा आनंद आपल्या आनंदात च असतो... स्वत:चा आनंद स्वत:ची स्वप्न तो तेव्हाच त्यागतो जेव्हा तो बाप होतो... कधी कधी आपण आपल स्टेटस जपण्याच्या नादात बापाला पार परके करुन टाकतो.. पण आपल तेच स्टेटस बनवण्याच्या पाया तोच तर रोवतो... आपल्या फिज् भरण्यासाठी ओवरटाईम करतो वेळप्रसंगी उधारी साठी हाता पाया ही पडतो.... त्याच बापासोबत राग लोभ बाळगण खरच बरोबर आहे का...??
लहानपणापासुन तो आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो म्हातारपणी मात्र आपण त्याला इतके अनोळखी कसे काय होतो...??? आयुष्यभर सावली प्रमाणे सोबत असणार्या बापाला मात्र म्हातारपण केअरसेंटर मध्ये काढाव लागत.... कधी त्याच्यासोबत मतभेद होतात तर कधी त्याच्या मनाविरुद्ध आपण वागतो.. दरवेळी बाप बरोबर च असतो असे नाही... त्यांना समजवून घेऊन आपण चुका माफ पण करु शकतो... आपल लहानपण तो मात्र मुकाट्याने सहन करतो आपल्याला समजून घेतो आपल्याला हव नको ते पाहतो मग त्याच्या म्हातरपणाची आपल्याला अडगळ का होते...????
यशोदा देवकी चे प्रेमाचे आपण नेहमीच गोडवे गातो पण भररात्री भर पावसात ज्या वासुदेवाने कृष्णाला नदीच्या पुरातून आणले त्याला कसे काय विसरतो...??? "कौशलेचा राम " असे नेहमीच म्हणतो पण पुत्रवियोगाने प्राण सोडलेला दशरथ मात्र नरजेआड होतो.... बस चा प्रवास करताना, ऑफिसात काम करताना, शेतात नांगर चालवताना, सिमेवर देशाच रक्षण करताना, त्याच्या मनात फक्तआपलाच विचार असतो....
कुठलाच बाप वाईट नसतो... तो ही जो चोरमार्या करुन मुलाच पोट भरतो आणि तो ही जो प्रामाणिक पणे आयुष्यभर काम करतो... तो ही बाप वाईट नसतो जो शेतात राबतो आणि तो ही बाप वाईट नसतो जो सिमेवर क्षणाक्षणाला मरणाला हुलकावणी देत असतो... प्रत्येक बापाला पोराच्या भविष्याची काळजी असते... आपल्या पेक्षा त्याच आयुष्य सुखाच जावो ही एकच त्याची भोळीभाभडी अपेक्षा असते....
बाप फक्त बाप असतो.....
एक जबाबदार व्यक्ति असतो...
मुलाच्या जन्मानंतर आनंदाने वेडावलेला असतो तो म्हणजे बाप असतो....
आपल्यासाठी निस्वार्थी पणे झटणारा देह असतो...
कठोर चेहर्या मागचा ह्रदयाचा मऊ लुसलुशीत तुकडा असतो..
आपल्याशिवाय अपूरा निर्जीव प्राण असतो...
आपल्या आनंदात आनंद मानणारा आणि आपल्या संकटात आपल्या बाजूने उभा राहाणारा आपली ढाल असतो...
बाप कधी च वाईट नसतो आपल्या सुख दुखात साथ देणारा आपला मित्र असतो...
बाप कधीच वैरी नसतो, आपल्याला आरडणारा पण आपल्या क्षणोक्षणी सावरणारा असतो....
आपल्याला कधी ही न दुखावणारा एक सच्चा माणूस असतो...
आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारा आणि आपल्यावर वेड्यासारख प्रेम करणारा असतो
आपल्यासाठी न थकता राबणारा हात असतो.....
बाप फक्त बाप असतो......
एक जबाबदार व्यक्ति असतो...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू