पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवन सत्व वायू तत्व


    *जीवंत सत्व वायू तत्व*

ब्रम्हांडांत प्रामुख्या ने पांच तत्व सक्रीय व सतत् चलायमान असतात हे तर सर्वांनांच माहित आहे, आणी आपले शरीर ही  तश्याच पंचभूतांची एक सुंदर रचना असून, ती ब्रम्हांडातील पंचभूतानेच कळसुत्री बाहुली प्रमाणे चलायमान रहातात , हे ही नक्कीच .

आपलं शरीर म्हणजे ब्रम्हांडा  -तील एक सूक्ष्मातीत अणु रेणु विकल्प आहे, ज्यांचे संतूलन ब्रम्हांडा कडूनच म्हणजे जयाला आपण निराकार, निर्गुण, अनंत असे म्हणतो त्या कडू न च होत असत.

*आपला मुख्य मुद्दा वायू तत्वा चा आहे तर आपण त्यावर विचार करू या*.

वायू एक स्वतंत्र निर्बन्ध स्वच्छंद तत्व आहे, ह्याला कांहीच परिसीमन नसते, काही मोजमाप नसते, हाँ पण त्याचा स्वतः चा गुण धर्म कांहीच नाही पण तो परिस्थितीजन्य पणे व जागे च्या स्थिती माना प्रमाणे अपला गुण धर्म सहज बदलू शकतो, हे नक्की.

आज जर आकाश, जल, थल, पाणी असुन , फक्त वायू च नसला तर सारेच निरर्थक आहे, कारण कुठल्या ही सजीव कळसुत्रा मध्ये जीव असणं म्हणजे नक्कीच वायू मुळेच होय.
वायू हा अति सूक्ष्मा पेक्षा ही सूक्ष्मातित घटक असल्याने, त्याची तिव्रता ही तेवढीच व्यापक असते, एक वेळ आपल्याला, जेवण खाणं पाणी उजेड उन नाही मिळा लं तरी जीवन यापन होऊ शकते, परंतु जेथे वायू चा तोटा झाला तर , जीव गुदमरणे, व्याकूळ होणं समोर ठेवलेल खानपान ही घेऊ न शकणं अशी स्थिती येता, मरणासन्न म्हणजेच प्राणांतिक वेळा किंवा शरीरातून वायू निघून जाणे असे म्हणलं जातं, म्हणजेच वायू हा पंचतत्वां चा एक मुख्य घटक आहे, जेणे
करुन मनुष्य, प्राणी, पक्षी, किंव्हा जगातील चौर्यांशी योनी तील प्राण असणं म्हणजेच जिवंत असणें वा प्राण नसणं म्हणजेच निर्जिव असणें असे मानले जाते.

अति सुक्ष्मते ने शरिरात स्थितप्रज्ञ न रहाता चंचल वृत्ती ने संपूर्ण शरिरात भरकटत राहाण हा त्याचा एक मोठा गुणधर्म आहे.
आपल्या शरीरात अन्य घटक महत्व पूर्ण असले तरी वायू अति सूक्ष्म व पारदर्शी तत्व असल्याने, त्याचा असंतुलना चा प्रभाव अतिशय विकराळ रूप घेऊ शकतो, शरिरांतील तीव्र वेदना, भिन्न-विभिन्न , जीव घेणे आजार हे मुख्य रुपे दूषित वायू किंवा असंतु -लित वायू- प्रमाणा च्या कारणानेच होत असते .

वायू चा आरोग्या बरोबर एक घनिष्ठ व प्रगाढ़ संबन्ध आहे. साधारण पणे जे लोक, नियमित पणे प्राणायाम , व्यायाम रुपे किंवा योग, व आसनां च्या द्वारे अपले प्राणवायू संतुलन नियमित व  शुद्ध ठेवतात, त्यांना बाहेरचे रोग काही करू शकत नाही कारण शुद्ध वायू नेच प्रतिरोधक उर्जा निर्माण होते, व शरीर  स्वस्थ्य व निरोगी असतं.

म्हणून जाणकार लोक शुद्ध नैसर्गिक वायू च्या सानिध्यात
राहणं प्रथम प्राथमिकता जाणतात. वायू कुंद दुर्गंध कुजकी नको, जी रोगराई किंवा महामारी ची करता करविता असते .
पूर्वि ही राज महल व शहर होत असतं परंतु ऋषी व मुनी वनचरीच  असायचे, नैसर्गिक हिरवळी ची शुद्ध सात्विक वायू( व शुद्ध फलाहार, कंद मूळ हेच ) त्यांचे स्वतः चे ध्येय सिद्ध करायचे द्योतक होतं.

शुद्ध वायू चा नैसर्गिक उद्गम म्हणजे मोठ मोठाले कल्पवृक्ष व हिरवळ , रान राई , वन-जंगल जंगल इत्यादि अनेक समुद्री शैवाळ व अन्य जीव ही प्राणवायू उत्सर्जना चे कार्य सत त् करत असतात, प्रकृती चा समतोल हा ऋतु चक्र ही होय, जो जीवंत मनुष्या चाच हातात आहे.

एका रोगी मनुष्यांस जर कांही उपचार म्हणून औषधं दिलीं गेलीत,ती अन्न चयापचय दृष्टी ने सुपाच्य अरुल्यास च त्याचा प्रभाव प्रथम आमाशयात होऊन मग रक्ताभिसरणांद्वारे रोग असलेल्या भागात प्रभाव टाकतो, व अपाच्य असल्या स मला द्वारे निघून संपूर्ण अप्रभावीच ठरतो. समजा प्रभावी जरी ठरला तरी रक्त भिसरणां चे कार्य मुख्य रुपे चंचल चलित वायूनेच होते.

परंतू तरि ही, प्रत्यक्ष वायू च्या सानिध्यांत औषोधो -पचारा ची विधा ही अतिशय उत्तम तत्काल प्रभावी ठरत असते,जसं सर्दी,ताप असल्यास आपण जे नासिका माध्यमाने, म्हणजे प्रत्यक्ष वायू मार्गे जे कांही उपचार पाठवतो ते तत्काळ प्रभावी ठरतात,व टेबलेट चूर्ण चयापचय मध्ये वेळ लागतो च . क्लोरोफार्म ने लगेच बेशुद्धी येते ती खायच्या कुठल्या पदार्था पेक्षा अतिशय तत्काळ.
होम हवन जे सामूहिक व उघड्या स्थळांवर केलं जातं ते वायू शुद्धिकरण ह्याचे एक उत्तम माध्यम असते, त्यांत विविध प्रकार चे सामग्री, उदाः वनोपचरी सर्पण, समीधा, तूप तिळ व अन्य शुद्धिकरणा चे साहित्य समाहित असल्या ने, वातावरण शुद्धिकरणास सिद्ध ठरतात.
अपाल्या शरीरात मुख्य पांच प्रकार च्या वायू असतांत:-
१. प्राण :- मस्तक छाती कंठ जीव व नासिका, मध्ये वास्तव्यात असून व्यक्ती ला मस्तिक म्हणजे विचार विनियम न ला सहयोगी. मना चे कार्य क्षेत्र असते, आपल्या सर्व इन्द्रिये सक्रीय ठेवते.
२. अपान :- गुदा, अण्डाशय मुत्राशय , इत्यदि सक्रीय व संचलित करतो,
३. समान :- जठराग्नी ला वाढवणारा असतो.
४. उदान:- नाभी, कंठ, वाणी , वक्ष ला सक्रीय व संचलित करतो .
५. व्यान :- संपूर्ण शरीर मध्ये व्याप्त असते प्रत्यंगा चे संकूचन अकुचन ह्या मुळे संभव होते .
पूर्वकाळी महान, ऋषी,मुनी, संत मृतात्म्याच्या शरीरी संजीवन विद्या किंव्हा इतर विद्या द्वारे पुनः प्राण स्थापित करायचे व जीवनदान द्यायचे असे  पाहिले होते, त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरी पांच उप वायू ही असतातात,
१.देवदत्त, २.नाग ,३. कृकल
४. कूर्म, ५ . धनंजय.
हे क्रमशः शिंक येणे, पलक झपकणे, जाम्भाळी येणे, खाजव येणे व हिचकी घेणे हे कार्य पार पाडतात.
तर मृत शरिरा भोवती हे पांच वायू सतत दोन दिवस भरकटत असतात ज्याला योग विद्या व संजीवन विद्या चे संपूर्ण ज्ञान आहे ते महात्मा आपल्या विद्येच्या प्रभावे धनंजय वायू ला रोकून ठेवतात, कारण हाच सर्व उप प्राणांचा मुख्य प्रणेता असतो, ह्या धनंजय वायू ला पुनः शरिरात प्रवेश करवतात, ज्या कारणे इतर उपवायू व तदनंतर मुख्य पंच प्राण वायू आपसूक स्थापित होतात .
खूप वेळा आपण स्वतः ही उदा:रण बघितले आहे कि दवाखान्यात ही मृतःप्राय किंबहूना मृत व्यक्ति ही तत्काळ पुनर्जिवीत होतो , घरी सुद्धा मृत व्यक्ती अचानक पुनः जिवित होतो, कधी कधी  अंत्येष्ठी च्या वेळी ही व्यक्ती चे हात पाय हलून तो जिवित होतो .

हा सगळा वायू चा च व्याप आहे, ब्रम्हांडतिल चार तत्व स्थूळ असतांत जड असतात निर्जिव असतात, परंतु वायूच असा एक प्रामुख्य तत्व आहे जो सर्वांना चलित करतो चालना देऊन चंचलता जीवन प्रदान करतो .
तर असे आहे वायू तत्व चे महत्व .


हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास।*
*अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास।।25।।*

ह्या सुंदरकांड च्या दोह्यात महान  कवि *तुलसीदास *  ने मारुती, वायुपुत्र च्या बरोबर जाणाऱ्या 49 एकूण एकोणपन्नास वायूं चे वर्णने केली आहेत , ज्ञान विज्ञान च्या दिशे ने आज सर्वेक्षणां मध्ये ह्या गोष्ठी अन्वेशित होत आहेत, जे पूर्वी च आपल्या ऋषी मुनींनी लिहून ठेवले होते , मग आपले पुरातन वैदिक, सनातन ज्ञान किती तरी पटी ने महान बलाढ्य होतंं बघा.

    ब्रह्मलोक, इंद्रलोक, अंतरिक्ष, भूलोक ची पूर्व दिशा, भूलोक ची पश्चिम दिशा, भूलोक ची उत्तर दिशा और भूलोक ची दक्षिण दिशा, ह्या प्रमाणे :- 

*7 x 7 = 49*
कुल 49 मरुत होत, जे देव रूपे  विचरण करत असत .
 
*आहे ना अद्भुत ज्ञान, रामायण, भगवद् गीता तर आपण वाचतो परंतु त्यात समाहित छोट्या छोट्या गोष्टींचे अध्ययन केल्या वरअनेक गूढ़ एवं ज्ञानवर्धक गोष्ठी आपल्या संज्ञानात .

       सौ. सुलोचना बेलापुरकर
            *अपराजिता*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू