पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भीमा.........

लेखणीतल्या त्या शब्दांची धार होतास तू...

अन्यायाशी झुंजणारी तळपती तलवार होतास तू...

बिघडलेल्या त्या काळाचा सुधार होतास तू...

भीमा सार्‍या भारताचा आधार होतास तू...

 

धडधडत्या वाणीचा प्रचार होतास तू...

अविचाराच्या दुनियेतला सुविचार होतास तू...

नशीब सारं बदलवणारा विचार होतास तू...

भीमा सार्‍या माणुसकीचा आधार होतास तू...

 

सैरभैर त्या पाखरांना मायेचं आकाश होतास तू...

अज्ञानी त्या लेकरांना ज्ञानाचा प्रकाश होतास तू...

सनातनी त्या वृत्तीवरचा प्रहार होतास तू...

भीमा सार्‍या गरीबांचा आधार होतास तू...

 

निस्तेज सार्‍या ताऱ्यांचा झंकार होतास तू...

अन्यायाशी झुंजणारा मूकनायक झुंजार होतास तू...

हक्क आणि कर्तव्याचा जाणकार होतास तू...

भीमा सार्‍या शोषितांचा आधार होतास तू...

 

मानवतेच्या विचारांची ललकार होतास तू

चेतविण्या विचार नवे निखार होतास तू

पेटविण्या अविचार जुने अंगार होतास तू...

भीमा सार्‍या समतेचा आधार होतास तू ...

 

पांगलेल्या पाखरांना एक येण्या पुकार होतास तू

मोडक्या तोडक्या त्या जीवांचा आकार होतास तू

कोमेजल्या त्या निळ्या फुलांचा बहार होतास तू...

भीमा सार्‍या मानवतेचा आधार होतास तू...

 

श्री. संदिप पंडित 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू