पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विठु माऊली

विठू माउली

..............

विठ्ठलाच्या दारी

आला वारकरी

कर कटीवरी

हरी उभा.

 

जाता पंढरीस

मिळे स्वर्ग सुख

दिसे हरिमुख

पांडुरंग.

 

चंद्रभागा करी

शुद्ध तन मन

स्नानाचे ते पुण्य

थोर लाभे.

 

विठ्ठल विठ्ठल

नाम हे मुखात

रूप अंतरात

रात्रंदिन.

 

दर्शनाची आस

लागता जीवास

तहान मनास

विठोबाची.

 

युगे अठ्ठावीस

विटेवरी उभा

वैकुंठाची शोभा

विठू माझा.

 

...उज्ज्वला राईकवार

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू