पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

Vithu Raya

विठुराया 


ह्याही वर्षी का रे ?

नाही बघत तुझी वारी 

का रे अशी बंधने

जी मजा येऊच न देती तुझ्या द्वारी .....(१)


गतवर्षी कशी तरी 

घातली मुरड मनावरी 

अरे ह्या लेकराने च का रे?

न भेटावे आपल्या माय-बापास तरी .....(२)


जीव माझा व्याकुळला भारी,

आस लागली तुझी जिव्हारी, 

हक्काने सांगतो तुझं, होऊन एक वारकरी 


आजन्म मनोमन तुला स्मरणारी, 

तुझे रुप चित्ती ठेवणारी, 

ही माझी काया, पुढील वर्षी तरी,

बोलाव रे तू पंढरी 

बोलाव रे तू पंढरी ........(३)


अमेय पद्माकर कस्तुरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू