पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी...


भिजायला कोणी नाही

तो एकटाच कोसळत राहतो।

तिला पाहण्याऐवजी 

मी त्यालाच पाहत राहतो।


हल्ली तो काळवेळ पाळत नाही

दिवस असो वा रात्र।

तो कोसळत राहतो वेळीअवेळी, 

अवकाळी किंवा पावसाळी

त्याचे चालूच असते सत्र।


त्याचा प्रयत्न दिसतो

तिला भिजवण्याचा रिझवण्याचा

पण तिला त्याचा गंध नसतो।

त्याच्या भावनेवर मात्र

तिच्या मनाचा प्रतिबंध दिसतो।


एकीकडे ती मश्गुल दिसते

सजण्या सवरण्यात

तिच्या मनाच्या भावविश्वात

तर दुरीकडे 

तो अविरत कोसळत राहतो।

मी स्तब्ध होऊन त्यालाच पाहत असतो।


कधीतरी मोकळे होते आकाश

तो किनाऱ्याचे शल्य ठेवून उरात

नदीच्या वाटेने निघून जातो।

पण तरीही मी त्यालाच पाहत असतो

तो नकळत पापणीतून ओघळत राहतो।

--सुनिल पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू