पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मायाजाल

पास झाला तो एमपीएससी परीक्षा

पण शेवटी हारला तो जीवनाची परीक्षा

किती दिवस बघणार नोकरीची वाट

शेवटी लावली स्वतःचीच वाट

झुर-झुर झुरला

शेवटी परिस्थितीपुढे हरला

नाहक दिला स्वतःचा जीव

पण पुढाऱ्यांना येणार नाही कीव

आईने केला आक्रोश

म्हातारपणी उडाला तिचा होश

घातला त्याने आईच्या काळजावर मोठा घाव

नियतीने साधला डाव

झाला त्या माऊलीवर मोठा आघात

कसा पचवेल ती हा अपघात

सोडूनी गेला तो तिचा हात

नाही होऊ दिला काळाने त्यांचा थाट

म्हणून माऊलीने दिला सरकारला तळतळाट

खरंच एमपीएससी एक 'मायाजाल'

पण त्यामध्ये गरीब, होतकरूंचेच का होतात हाल?

मग मंत्री कसे लाटतात बक्कळ माल

करुनी हुशार विद्यार्थ्यांचे बेहाल



कवी- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर,ता.तुळजापुर

भ्रमणध्वनी-9326807480



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू