पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जुळू दे नव्या वाटा

जुळू दे नव्या वाटा..


सज्ज आहे मी पुन्हा

तू ही ये आता।

रंगीत क्षितिजाच्या  

मार पुन्हा बाता।


पुन्हा जमव शब्दाचा 

नवा फौज फाटा।

मी ही फसेन अलगद 

असेना का तो खोटा।


येवू दे उधाण पुन्हा 

थडकू दे उन्मादी लाटा।

शिणलेल्या मनात मात्र  

रुजू दे प्रेम पाणवठा।


बहरू दे नव्याने गुलाब 

नको खुडू त्याचा काटा।

दुभंगल्या मनाच्या आता 

जुळू दे नव्या वाटा।

--सुनील पवार..✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू