पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मुंबईचा पाऊस

मुंबईचा पाऊस..


मुंबईचा पाऊस 

तसा भिन्न आहे जरा।

कुठे सुखाच्या सरी

तर कुठे दुःखाचा पसारा।


खिडकीतून डोकावणारा

मनास भुलवणारा।

छतातून गळणारा

डोळ्यातुन पाझरणारा।

मुंबईचा पाऊस..


कुठे रस्त्यात थांबणारा

कधी अविरत चालणारा।

चहाच्या संगतीने

भजीवर ताव मारणारा।

मुंबईचा पाऊस...


शाळेच्या भोवती

तळे साचवणारा।

आयाबायांच्या जीवास

घोर लावणारा।

मुंबईचा पाऊस..


हातावरच्या पोटाला

चिमटा काढणारा।

कुणाच्या हातातील

ग्लासात फेसाळणारा।

मुंबईचा पाऊस...


बातम्यातून सुखावणारा

सत्यात वेगळा असणारा।

तुमच्या लेखी तोच

स्पिरिट जागवणारा।

मुंबईचा पाऊस 

तसा भिन्न आहे जरा..

--सुनिल पवार..✍????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू