पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उत्तरार्ध



कथेचे शीर्षक - ' उत्तरार्ध '




दिवाळी आली तशी गेली.

 

तुळशीचं लग्न होई पर्यंत मात्र lighting, आकाशकंदील ठेवायचा दर वर्षी प्रमाणे आणि नंतर तोही नीट घडी घालून कपाटात ठेवून द्यायचा! पुढल्या वर्षीच्या प्रकाशाची वाट बघत! मग

 

वर्षभर बिचारा अंधारात! 





काय गंमत असते ना, माणसांच्या व्यथा माणूस बोलून व्यक्त तरी करू शकतो..पण वस्तूंचं काय...त्यांनाही दुःख, हुरहूर असेलच....



असो...तर या आलिशान घराचा मी मालक श्री मधुकर दिनकर! हां...आता तुम्ही म्हणाल आडनाव काय? 

 

तर मी म्हणतो, गरजच काय आडनावाची? 

 

ते मिळवण्यात आपले ते काय कर्तृत्व? आणि काय होतं ना की उगाच आडनावावरून लोक एखाद्या व्यक्ती बद्दलचे आपले ठरवतात...आधीच...तर ते असो!



बघा असं होतं... कोणत्याही विषयावर हल्ली कितीही वेळ बोलू शकतो मी! 



पण....आधी असा नव्हतो बरं...अहो इन्कम टॅक्स मध्ये service 

 

केली आयुष्याची 35 वर्ष! कामाचे स्वरूपच असे होते की कायम..चेहरा ताठ ठेवावा लागे. खडूस, शिष्ठ आहात तुम्ही, असं तुमच्या चेहऱ्यावरून एकदा दिसले ना लोकांनां..की मग लोक ही जरा अंतर ठेवतात तुमच्यापासून...त्यामुळे मग मी तसा कमीच बोलायचो..बाहेर..घरात..सगळीकडे! 

 

नातेवाईक, मित्र या सगळ्या गोतावळ्यात फार रमलो नाही मी...ते डिपार्टमेंट सांभाळले माझ्या बेटर हाफ ने!

 

अहो..कुटुंब आमचं..बायको! 

 

माझ्या अगदी उलट! तरुणपणी नाही पण म्हातारपणी लोक लागतात म्हणून जिकडे तिकडे माणसे कमावून ठेवली होती..आणि स्वतः मात्र म्हातारपणाची

 

चाहूल लागताच स्वर्गात जाऊन बसली. झोपेत ऍटॅक आला... शांत पणे गेली. 



काय आता आपल्या हातात तरी म्हणा...! ह्म्म्म



शो मस्ट गो ऑन म्हणतात तसा आपल्या आयुष्याचा शो चालला आहे. 

 

सकाळी उठतो, आमच्या कॉम्प्लेक्स मधल्या सीनिअर सिटिझन क्लब मध्ये जातो...तिथे मग मॉर्निंग वॉक, व्यायाम, हास्य क्लब..मग घरी आल्यावर मेड ने बनवलेला ब्रेकफास्ट मग शॉवर... परत बाहेर जाऊन काही बाहेरची काम नाहीतर परत क्लब.... वगेरे वगेरे वगेरे.... 



बँक बॅलन्स आहे, पेन्शन आहे, कोणतंही कर्ज नाही की छंद मकरंद ही नाहीत...



त्यामुळे आपल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सारखं सरळ चालू आहे आयुष्य!



...

 

...

 

...

 

हो...आहेत ना.. मुलं आहेत... आहेत की नाहीत तेच विचारायचे होतं ना! 



आहेत...  एक मुलगा... एक मुलगी. मुलगा अस्त्रालयात.... हाहाहा घाबरु नका ... अहो  म्हणजे ऑस्ट्रेलियात हो.... आणि लेक पार दुसऱ्या टोकाला...अमेरिकेत!



दोघे इंजिनियर... एकदम वेल सेटल!  लहानपणापासून

 

पालक म्हणून आम्ही दोघे कुठे कमी पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली. शाळा... पुण्याची एक नंबर शाळा! महागडे कोचिंग क्लासेस, एक्स्ट्रा करी क्युलर

 

अक्टिवितिज.. पोरांनी पण चीज केलं...बोर्डात आली.

 

कॉलेज मध्ये ही दणकून मार्कनी पास झाले... कॅम्पस मध्येही चांगली संधी मिळाली.




आम्ही पैसा ओतत होतो आणि मुलं त्याचं सोने करत होते. अहो...प्रत्येक बापाला वाटतच ना की आपली मुलं सेट झाली पाहिजेत आयुष्यात! 

 

पाच सहा आकडी पगार...घर..गाडी... पै पै ची चिंता करायची गरज पडली नाही पाहिजे.




दोघानाही मग कंपनी तर्फे ही बाहेरची ऑफर आली. आधी 3 वर्षासाठी..मग अजून 3 वर्षासाठी .. असं प्रोजेक्टचे एक्स्टेंशन मिळत गेले आणि

 

लेकरांनी अगदी खुद के बलबुतेपे तिकडची सिटिझन शिप मिळवली.

 

काय...हेवा.. वाटतोय ना माझा! हाहा... अहो वाटणारच.... वाटायला च हवा! 



आता दोघांचीही लग्न झालीत...हो, हो..अगदी इकडे भारतात येऊन साग्र संगीत पद्धतीने ...आमच्या दोघांच्या संमतीनेच लग्न केले दोघांनी.



कसलीच खंत नाही ठेवली हो मुलांनी...श्रावण बाळच दोघेही! जिंदगी बहार है...असा फील दिला कायम लेक्रानी!



ह्ममम...

 

पण हल्ली ना

 

बेटर half ची आठवण येतेय फार. जबाबदारी संपली... नोकरी संपली... वेळ आहे हातात आता..

 

कामाच्या व्यापात तिच्या बऱ्याच इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत....

 

 त्या आता करता आल्या असत्या असं वाटतंय! आधीच हे म्हातारपण...आणि त्यात एकटेपण!



मुलं म्हणतात... इकडचे सगळे wind up

 

करा बाबा आणि या आमच्याकडे कायमचे!

 

म्हणजे...

 

सहा महिने लेकाकडे

 

..सहा महिने लेकिकडे....



पण... हमम... नाही होत हो असं.... आयुष्यभराचा संसार... आपलं मांडलेले जग असं आयुष्याच्या उत्तरार्धात असं मोडून दुसरीकडे नाही पुन्हा उभारी घेऊ शकत. 

 

भातुकलीचा खेळ का तो! 



थोडे दिवस जाऊन येऊन राहायला ठीक आहे पण कायमचे...आपला देश..आपली माणसे..आपले घर सोडून नाही दुसरीकडे राहायला जाऊ शकत हो.... तिथे मुलं कामाला गेली ना...की घर खायला उठते...आजूबाजूला कोण शेजार नाही ..की कोणी ओळखीचे पाळखीचे नाहीत.



बंद घरात...त्या टीव्ही च्या डब्या समोर किती तास बसणार माणूस! बेटर हाफ तर तिथे गेल्यावर आठवडा भरात कंटाळून जायची. 



आणि आता तर मी तिथे गेलो तर दिवसभर मुलं येई पर्यंत एकटा काय करणार हो.. I hope..

 

तुम्ही समजू शकाल मला...माझी अवस्था तुम्हाला लक्षात आली असेल. पण....पण..

 

...... काय आहे ना....मुलांना हे समजत नाही.

 

मागची पाच वर्षे हेच सांगतोय मी, समजावतोय‌

 

मी मुलांना....!  नाही करमत रे तिथे पोरांनो!

 

आता झालं असं आहे...की मुलं इकडे परत येऊ शकत नाहीत कायमची.  कारण त्यांचं करिअर...त्यांची नोकरी...नातवंडांचे शिक्षण.....हे सगळं तिथेच तर आहे....आणि.... ...हो...हाच सगळा अट्टाहास जन्मभर केला होता मीच...हेच मुलांना  मिळवण्यासाठी ... मिळवून देण्यासाठी कायम आग्रही राहिलो.




आणि आता...कोणत्या तोंडाने म्हणू..की या तुम्हीं परत! 

 

कारण मी एकट

 

 पडलोय रे...



पण नाही येत आता दोघेहि फारसे... आधी वर्षातून एकदा यायचे. मग 2 वर्षातून.. त्यांची आई गेल्यावर एकदा आले.... दिवस पाणी झालं... मग तिथं काही मी कायमचा येणार नाही सांगितल्यावर मग मात्र त्यांच भारतात येण जवळ जवळ बंद झालं. हा हा हा...अहो श्रावण आहेत पण आधुनिक श्रावण बाळ आहेत हि मुलं.... सगळं करतील पण 

 

त्यांच्या अटी वर... असो!




आता

 

पैसा आहे..

 

चिक्कार आहे... पण रिकामे घर खायला उठते ... 

 

सकाळ , दुपार संपता

 

संपत नाही. संध्याकाळ नकोशी वाटते.  आठवणी त्रास देतात संध्याकाळी.  आठवतं मग...मी संध्याकाळी यायचो ऑफिस मधून घरी...तेव्हा वाट बघत असणारं माझं घर.... बेटर हाफ किचन मध्ये स्वयंपाकात रमलेली. आमटी भाताचा घमघमाट...मी आल्याचे पाहिल्यावर ठेवलेले चहाचे आधण ... मस्त सुगंध चहाचा....

 

...मुलांचेखेळ..अभ्यास...गडबड.... नुसता धुडगूस असायचा घरात!.



सगळं सगळं सगळं आठवतं हो.... डोळे बंद असतात हे सगळं आठवताना...कारण डोळे उघडतो तेव्हा भकास..उदास संध्याकाळ.... निर्जीव भिंती.....शांत झालेलं स्वयंपाकघर...... नाही...नाही..बघवत हे....




रात्री झोपतो तेव्हा वाटतं की सकाळी उठू की नाही...आणि झोपेत जीव गेला तर...तर कसं कळेल लोकांना....कोणी जात येतही नाही घरी... घाबरत घाबरत झोपतो. .पहाटेची चाहूल लागली की जरा बरं वाटतं .....आवरून जातो मग.... 

 

हास्य क्लबात ..हसायला.....  हा हा हा..

 

चला...संध्याकाळ झाली...

 

आकाश कंदील लावतो.



मी म्हंटले ना की अहो...हल्ली फार बोलतो हो मी!

 

आधी असा  नव्हतो. आणि

 

तुम्ही नका senti

 

होऊ हो माझ्यासाठी.... असे कितीतरी असतील पालक तुमच्या आजूबाजूला.....किंवा...किंवा कदाचित...तुमचेच पालक ???




घ्या काळजी त्यांची!.  :)



चला....निरोप घेतो...काळजी घ्या तुम्ही सर्वांनी! सुखात  रहा.... समाधानात रहा!!

​शुभम भवतू!????



भेटू परत!




© प्रज्ञा पंडित

 

ठाणे 








पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू