पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

थ्री चियर्स...

   थ्री चियर्स.......

               (एक निरागस मैत्रीची कथा )


 पिया जेवणाच्या टेबला वर नुसती बसून होती. तिचे जेवणात अजिबात लक्ष नव्हतं. ती भात नुसता चिवडत  होती. हातात जरी घास होता तरी लक्ष कोठे भलतीकडेच होतें  
    पियू...... मधुराच्या आवाजाने ती भानावर आली. अगं..  जेवतेस ना? ह्या वर तिनें भूक नाही असं उत्तर दिलें व ती पानावरुन उठली व हात धुवून बेड रूम मध्यें गेली. 
        मधुराचे जेवण आटोपल्यावर सर्व आवरून ती पियाच्या बेड रूम मध्यें आली. पिया अंथरुणावर नुसती 
पडून होती, तिची नजर छ्ता कडे होती पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. 
          मधुराने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती गप्पच होती. 
      पियू.... अगं कायं झाले आहें?  कोठे कायं?? काहीच नाही, असं म्हणतं ती बाहेर हॉल मध्यें गेली. 
   पिया मधुरा मनीष ची एकुलती एक लाडकी लेक होती. 
 दहा बारा वर्षाची गोरीपान सोनेरी केसांची पिया थोडी अंतर्मुख च होती. ती कोणात विशेष मिसळत नसे.  शाळेत देखील तिच्या 
मोजक्याच मैत्रिणी होत्या. आपण बरे किं आपले कामं बरे, ह्या वृत्तीच्या पियाच्या तोंडी एक नावं मात्र सतत असायचे. 
जीनी ने आज डब्यात हा खाऊ आणला होता. आज जीनी चे काका तिला बाईक वर सोडायला आले होतें  तर 
कधी जीनी च्या चुलत बहिणी ने केलेल्या जीनी च्या हेअर स्टाईल चे वर्णन असायचे. एकूण कायं, जीनी तिची 
चांगली मैत्रीण झाली असावी. 
  तुझी मैत्रीण कशी आहें ग.? पियाची कळी खुलावि ह्या विचाराने मधुराने जीनी चा विषय काढला. 
  जीनी तीन  चार दिवसा पासून शाळेत येत नाहीये. पिया ने तोंड उघडले. 
अस्स्स. होय.!म्हणून आमची नाजूक कळी कोमजली तर !!मधुरा ने तिला प्रेमानं जवळ घेतलं. चल, आपण तिला फोन करूया ! असे म्हणत मधुराने नीना, जीनी च्या 
मम्मा ला फोन लावला . 
 बराच वेळ रिंग जात राहिली, कोणी फोन रिसिव्ह केला 
नाही. कदाचित नीना कामात असावी पण थोड्याच वेळात नीनाचा स्वतःहून फोन आला. 
 तिच्या कडूनच समजले किं सात. आठ दिवसाच्या तापामुळे जीनु ला हॉस्पिटल मध्यें भर्ती केलें होतें. बराच अशक्त पणा आला होता. मलेरिया टायफॉईड?? ह्याचे 
अचूक निदान अजून झाले नव्हते 
 मधुराने पियाला विशेष काहीं सांगितलं नाही. पण उद्या आपण तिच्या लाडक्या जीनु ला भेटायला हॉस्पिटल मध्यें जाऊ एवढेच सांगितलं. 
 पिया आनंदली, आपल्या छोट्याश्या बेग मध्यें एक चॉकलेट, "get well soon"चे एक सुंदर कार्ड. व काहीं रंगीत रबर, पेन्सिल ठेवून उद्याची तयारी करून झोपली. 
दुसऱ्या दिवशी पत्ता शोधत त्या दोघी दवाखान्यात पोहोचल्या. 
     जीनीची चुलत बहीण, काका, काकू आई, वडील सर्वच दवाखान्यात होतें. 
पियाला ह्या एकत्र कुटूंबाचे देखील खूप कुतूहल होतें. 
 जीनी च्या एकत्र कुटूंबाचे तिला नेहमीच आकर्षण वाटत असे. काका काकू, ताई दादा, आजी आजोबा !!  घरात प्रत्येक खोलीत माणसं असायची. सॉफ्ट टॉय,  खेळणी ह्यांची गरजच भासायची नाही. कधी दादा फिरकी घ्यायचा तर कधी काका चॉकलेट द्यायचे. 
 पियाच्या घरी मात्र ती व मधुरा अश्या दोघीच असायच्या. बाबा सहा महिने बोटी वर असायचा. तसं खूप सारी खेळणी व तिचा dogy होता पण तिचे मन त्यात विशेष 
रमायचे नाही. 
  आता देखील पियाला बघताच काका पुढे आले व त्यांनी पियाला प्रेमाने जवळ घेतलें व तें जीनी च्या रूम 
कडे वळले. 
तापाने मलूल व अशक्त झालेली जीनी बेड वर झोपली 
होती पण नीना मात्र सतत डोळे पुसत होती. 
 विचारपूस केल्या वर जे कळले तें फार भयानक होतें. टायफॉईड च्या तापाचे निदान"ब्लड कॅन्सर "झाले होतें 
  A. L. L. ( Acute lymphatic lukemia ). 
मधुरा हे ऐकून हादरूनच गेली. 
  दोन बाल मनाना मात्र ह्याची काहीच कल्पना नव्हती. 
त्यांचे विश्व् चॉकलेट, रंगीत पेंसिल्स शाळेचे मित्र, मैत्रिणी एवढेच होतें. 
मधुरा बराच वेळ नीनाशी बोलत होती जिनीची कीमो चार.. पाच दिवसात सुरू होणार होती.
तेवढ्यात काका तेथे आले व त्यांनी तो विषय शिताफीने 
बदलून वातावरण थोडे हलके केलें. 
जीनी भेटल्याने पिया बरीच आनंदात होती. घरी आल्यावर तिचा आनंद द्विगुणित झाला. 
 तिचा" डेंडू"सहा दिवसासाठी घरी आला होता. किती तरी दिवसानंतर ती मनिष च्या कुशीत शांत पणे झोपली होती.
तिचा बाबा भेटल्याने तिला जिनींचा थोडा विसर पडला असावा. पण मधुराचे मन मात्र बरेच अस्वस्थ होतें व अश्यातच तें वेगळे निमंत्रण पत्र आले
" जीनी च्या "शौर्य "समारंभा साठी आपण सादर आमंत्रित आहात!
     स्थळ... सेलिब्रेशन सलून अँड पार्लर,   परळ."
                                     गुप्ता परिवार!!
आजारी जीनी साठीच काहीं कार्यक्रम ठेवला असणार. असा कयास मधुरा ने बांधला.
दुसरे दिवशी पिया तयार होऊन, एक सुंदर पुष्प गुच्छ
घेऊन तिच्या लाडक्या डैडू बरोबर निघाली
"सेलिब्रेशन सलून व पार्लर " हे अगदी आगळे वेगळे पार्लर होतें.
     डॉ आकांक्षा देशपांडे ह्यांची ही हृदय स्पर्शी संकल्पना होती.
कॅन्सर च्या रुग्णाचे कीमो थेरेपी घेतल्या नंतर सर्व केसं
गळतात. शारीरिक कष्टाबरोबरच हा फार मोठा मानसिक
धक्का असतो. ह्या धक्यातून रुग्णाला उभारण्याचा हा
त्यांचा एक प्रयास होता
कॅन्सर चा रुग्ण कीमोथेरपी च्या अगोदर पार्लर मध्ये
येऊन आपला "शौर्य "समारंभ साजरा करतात.
रुग्णाच्या उत्साह वर्धना साठी रुग्णाचे आप्त, मित्र, मैत्रिणी देखील आपले केश वपन करतात.
जीनी साठी हाच "शौर्य "समारंभ नियोजित केला होता.
सर्वात अगोदर जीनीच्या चुलत बहिणीने टाळ्यांच्या गडगडात आपले केश वपन करवले. नागा सारख्या खांद्यावर रुळणाऱ्या रेशमी लडा झरझर खाली पडत
होत्या, नंतर जिनींच्या दोन्ही काकांनी तिचा उत्साह वाढवण्यासाठी आपले "चमन गोटे "केलें.
आता जिनीची पाळी होती. गुलाबी रंगाचा रेशमी गाऊन घालून जीनीला आणले.
भीतीने किं अशक्त पणामुळे ती थरथर कांपत होती.
मधूर संगीत वाजत होतें."थ्री चियर्स फॉर जीनी "च्या निनादात जिनींचे केंस काढले. टाळ्यांचा गडगडाट झाला.
पार्लर च्या मेनेजर ने एक सुंदर क्राऊन तिच्या मस्तकावर ठेवला. तिच्या वर फुलांचा वर्षाव केला. एखाद्या प्रिन्सेस
प्रमाणे रेड कार्पेट वर चालत ती आपल्या जागेवर आली
आई, बाबा, काका काकू मैत्रिणींनी तिला सुंदर भेट वस्तु
दिल्या. काकांनी सर्वांना मग पेढे वाटलें!
     पिया हे सर्व भेदरलेल्या नजरेने बघत होती. एकाएकी
मनीषचा हात सोडून ती उभी राहिली व दुसऱ्याच क्षणी ती सर्व धैर्य एकवटून, काहीं तरी निर्धार करून "शौर्य चेयर "वर येऊन बसली
    सर्वजण आश्चर्यचकीत होऊन तिच्या कडे बघत होतें
     "थ्री चियर्स फॉर जीनी " तिनें आपला छोटासा हात उंचावला व दुसऱ्याच क्षणी "केश वपन "साठी मान खाली केली. सुंदर सोनेरी कुरळ्या केसांची झुलूपे तिच्या खांद्यावरून औरंघळत खाली पडत होती.
   "शौर्य समारंभ "आता संपला होता.
  दोघी मैत्रिणी कडकडून एकमेकींना भेटल्या.
      Get well soon  jini
    , मी तुझी वाट बघत्येय!!


डॉ विद्या वेल्हाणकर
  अंधेरी, मुंबई 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू