पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अमानवी



खुळं पाटील गावातील मोठी आसामी..!! गावात दबदबा.. 

आता खुळं पाटील हे नाव मजेशीर..

त्या नावाला पण इतिहास.. 

पाटील टापटीप रहाण्यात नंबर एक..

हौशी..

कडक इस्त्रीचा सफेद कुर्ता...

शुभ्र बारीक काठाचे धोतर..

डोईवर भगवा फेटा..

तर...पायात करकर वाजणाऱ्या कोल्हापूरी चपला.. भरीत भर म्हणजे चपलांना लावलेले चांदीची घुंगरे..

मग चालताना घुंगराचा खुळू खुळू आवाज...

अन् यावरूनच सर्व गाव त्यांना खुळं पाटील म्हणायचे...आहे की नाही गंमत..!!

आज मात्र रामप्रहरीच पेठेतून खूळू खूळू आवाज घुमत होता. एवढ्या रामप्रहरी खुळं पाटील रस्त्याने कुठं चाललेत हे नामा दार किलबिल करून पहात होता. 

थयथयाट झाल्यासारखा आवाज आज कानाला कर्कश वाटत होता. 

नामा पटकन बाहेर आला..

"काय पाटील, काय गडबड.."

"काल रात्रीपासून शोभी घरी आली नाय..तालुक्याला जाऊन तक्रार नोंदवून येतो..!"

हे ऐकताच नामाला एकदम चर्र.. झालं. 

पोरंग काल पासून घरी नाही. मनात पाल चुकचुकली...

दोन वर्ष झालं पोरगं धाकट्याकडे मुंबईला होतं..

बारावी दोन विषय फेल..

गावाकडे येऊन राहिले होतं.

शोभा पाटलाची एकुलती एक लेक..

नववीतून नुकतीच दहावीला गेलेली..

दिसायला देखणी नाक डोळं छान.. चार चौघीत उठून दिसायची..

पाटील वस्तीवर रहायला होता. 

मुलगी शाळा सुटल्यावर एकटीच घरी जायची..

नेमकं नामाचे शेत रस्त्यातच होते. पोरगं शेताला म्हणून जायचं...अन या पोरीची रस्त्यात छेड काढायचं.

दोन तीन महिने हा खेळ चालू होता.

पोरगी घाबरून गेली होती. कोणाला सांगायचं तर भिती होती... बा ला सांगाव तर नावाप्रमाणेच खुळं होतं.. डोक्यात राख कालवून घेतली व त्या पोराचे बरे वाईट केले तर....!!

आज मात्र विजय नामाचा मुलगा मनाशी ठरवूनच बांधावर उभा होता. शोभा आली की तिला आज उचलायचे व सरळ गोठ्यात घेऊन जायचे..! 

ती आली...

नेहमी प्रमाणेच तिची छेड काढली पण यावेळी शाब्दिक छेडछाड नव्हती.. 

आज अचानक तिचा हात पकडला..

ती पुरती घाबरून गेली..

ओरडली तरी आजूबाजूला ऐकायला कोणी नव्हते..

ती ओरडताच सरळ तिच्या तोंडात खांद्यावरच्या टाॅवेलचा बोळा सरकवला.. आवाज बंद..!

आता मात्र हाताने झटपट चालू होती. दप्तर तर कधीच बाजूला जाऊन पडले होते... ती मात्र गयावया करत होती. 

तिने कडकडून विरोध केला. 

त्याने तिला उचलली..

गोठ्यात नेली..

त्याची अमानुष वृत्ती जागृत झाली होती..

ती मात्र वेदनेची शिकार झाली.. 

खूप प्रतिकार केला पण सारे व्यर्थ्य...

तसं त्याचे वय पण अल्लड.. 

भानावर आला तेव्हा त्याची चुक कळाली होती.. हे सर्व खुळं पाटलाला समजल्यावर आपली खैर नाही.. उभा चिरून टाकेल..

नको नको हिला आता ठेवायचे नाही.. हा विचार मनात आला. शेजारीच पडलेल्या विळ्याकडे हात गेला...सप सप वार केले तर पहारीने डोक्यात ठोके टाकले...

जोरदार किंकाळ्या उमटल्या शोभा रक्ताच्या थारोळ्यात..

विजयला घाम फुटला...

मती भ्रष्ट झाली होती..

काय करतोय हेच समजत नव्हते..

सरळ तिला उचलली व मागील विहिरीत फेकून दिले..व स्वतः गावातून पसार झाला...



श्रीकांत दीक्षित.






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू