पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रसाद


आज अवी व दिव्याच्या ओल्या पापण्यातून वाहणाऱ्या गंगा जमना..

मन हेलावून टाकणारा आजचा प्रसंग..!!

मुलीची पाठवणी काय असते ते तिचे आई, बाबा झाल्यानंतरच समजते..

आज सवूची पाठवणी.. धुमधडाक्यात झालेले लग्न.. लेकीची व जावयाची केलेली हौस..

कोणत्याही गोष्टीची कमतरता ठेवली नाही..

सागर सरळ साधा आय टी इंजिनिअर पण कोणता अभिमान नव्हता. समंजस स्वभाव..!! अगदी सवूला योग्य स्थळ मिळाले होते..

आज मात्र आभाळ दाटून आल्यासारखे झाले होते. तो क्षण अगदीच समीप आला.. सविताने आपले डोके दिव्याच्या खांद्यावर ठेवले व तिच्या कुशीत शिरली.. अगदी हमसाहमशी रडली... आई वडिलांपासून वेगळं..!! कल्पनाच करवत नव्हती तिला. अवी दूरच उभा राहून हे पहात होता. किती तरी वेळ दाबून ठेवलेले आश्रू हे पाहून खळकन ओघळले.. आईच्या खांद्यावर डोके ठेवले असले तरी सविताची नजर बाबांकडेच होती. नजरेच्या त्या अदृष्य भाषेनेच दोघांनीही खूप संवाद साधला..

पण या आसवांच्या मागे खूप काही दडले होते..

अवी व दिव्या दोघांनीही भूतकाळाला गवसणी घातली..

अवी व दिव्या दोघेही काॅलेज मित्र..

एकाच क्लासमध्ये शिकत होते..

ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळलेच नाही.

दिव्या खानोलकर शहरातील महापौरांची मुलगी..!! घरात राजकीय वारसा. पण तिला या गोष्टीत आजिबात स्वारस्य नव्हते.. 

अवी हा तसं सामान्य कुटूंबातील.. पण वडिल पेशाने डाॅक्टर.. 

वडिलांप्रमाणेच तो ही हुशार.. 

अभ्यासात सर्वात आग्रेसर.. 

दिव्या अवीच्या या हुशारपणावरच फिदा होती..

दिव्या देखील दिसायला देखणी होती. चाफेकळी नाक तर नाकावर बारीक फ्रेमचा सुंदर चष्मा सौंदर्य अजूनही खुलवत होता. रंग गोरा व त्यावर गुलाबी पेहराव..अजब मिलाफ!! 

अवीवर तिची मोहिनी कधी पडली हे समजलेच नाही.

ओळखीचे रूपांतर मैत्रीत तर मैत्रीचे प्रेमात हा सुखदायक प्रवास अगदी लग्नापर्यंत पार पडला.

दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला संमती दिली होती..

अवी अभियंता होऊन सरकारी नोकरीत दाखल झाला होता..तर दिव्या इंटिरियर डिझाईनिंगमध्ये प्रवीण झाली होती.

दोघांचेही करियर अगदी नजर लागण्यासारखे..

खरंच नजर लागली होती..

गेले तीन वर्ष झाले पदरी मुलबाळ नव्हते..

दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते.. पण नियतीला हे का मंजूर नव्हते हेच समजत नव्हते..?? 

दोघेही तसे धार्मिक वृत्तीचे.. तुळजामातेचे भक्त..! अपार श्रद्धा होती. दरवर्षी न चुकता देवीच्या दर्शनाला तुळजापूरला यायचे. इतर वेळी टेकडीवरच्या मंदिरात नित्य नियमाने जायचे.

देवीला मुलासाठी साकडे घातले होते.. आपण काही मागायचे नाही या मताचा अवी पण दिव्याचे मातृत्व तिला गप्प बसू देत नव्हते. तिने हट्टाने देवीला नवस केला.

एक दिवस असेच दोघेही सायंकाळी टेकडीवरच्या मंदिरात गेले. दर्शन झाले व प्रार्थनेसाठी बसले होते..

तितक्यात..

मंदिराच्या गाभार्‍यातून आवाज आला..

लहान मुलाच्या रडण्याचा आवाज..

दिव्या धावत गेली..

अगदी तीन चार दिवसाचे एक बालक..

रंगीत दुपट्यात ते गोंडस बाळ गुंडाळले होते..

दिव्याने परत जात त्या बाळाला आपल्या कवेत घेतले..

खरंच देवीने आज माझे ऐकले..

हे कोणाचे भाउ असेल याचा जरा देखील विचार न करता..देवीचा प्रसाद घरी घेऊन आली..

आज सविताला निरोप देताना या सर्व गोष्टी फक्त त्या दोघांपुरत्याच मर्यादित होत्या. सविताला दोघांनीही आई बापाचे भरभरून प्रेम दिले होते...


श्रीकांत दिक्षित.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू