पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जरा बघ स्वतःकडे

इकडे तिकडे काय बघतोस

जरा स्वतःकडे बघ

गुलाबाला असेल सुगंध सुरेख

जरी तितकेच आहेत काटे

थुई थुई नाचतो मोर छान

फुलवून सुरेख पिसारा

 सुंदर रूपाचे प्राप्त आहे त्याला

 ईश्वराकडून वरदान

 कोकीळ असला रंगाने काळा

 तरी आहे त्याला गोड गळा

 प्रत्येकाचे आहे वैशिष्ट्य वेगळे

 प्रत्येक जणात काही निराळे

 मग दुसऱ्यांकडे असलेले गुण

 बघून वाईट का बरं वाटून घ्यावे 

 उलट स्वतःमधले वेगळेपण

 शोधून जपून पुढे जावे.

 

रश्मी अरणकले 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू