पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझा अविस्मरणीय प्रवास

प्रवास म्हटला म्हणजे मन कसे प्रफुल्लित होतें. त्या बॅगा भरून तयार ठेवणे, वाटेत खाण्यासाठी डब्बे, वॉटर बॉटल्स, गेम्स, सारेच कसें रोमांचित करणारे असतें.
      माझ्या प्रवासात हे काहीच नव्हते पण तरी देखील माझा रोमांचित प्रवास अविस्मरणीय होता.
   27जुलैचा दिवस होता. मागल्या सतत तीन दिवसा पासून मुसळधार पाऊस पडत होता, सारी धरा हिरवीगार झाली होती, नदी नाले तुडुंब भरले होतें
   T. V. समोर बसून गरम गरम कांदे भाजी चा आस्वाद घेत असतानाच एक बातमी आली.
     नेमावरच्या दूरस्थ गावात नर्मदेचे पाणी शिरले होतें. त्या गावाचा संपर्क सर्व बाजूनी तुटला होता. तेथील माणसे, जनावर ह्याच्या जीवाला धोका होता.
    पाण्याचे स्तर वाढतच होतें
     कांदा भजी बाजुला सारून, टीम ला एकत्र करून व बरोबर आवश्यक औषधे घेऊन आम्ही त्या गावी जाण्यासाठी सज्ज झालो पण त्या गावी पोहोचायचे कसें हा मोठ्ठा प्रश्न होता, पण
थोड्याच वेळात कलेक्टर साहेबांची गाडी आम्हाला घ्यायला आली व मी माझ्या टीम बरोबर पोलीस ग्राउंड ला पोहोचलो. तेथे आल्यावर समजले किं आम्हाला त्या गावी हेलिकॉप्टर नें जायचे
आहें!

ऐकून जरा भीतीच वाटली. एरवी विमानाने प्रवास करणे वेगळे, व हेलिकॉप्टर नें ड्युटी वर जाणे वेगळे.

बरोबर गावाकऱ्यांसाठी ब्रेड, बिस्कीट्स चे पुडे, लंच पॅकेट्स, लहान मुलांसाठी दूध, ब्लॅंकेट्स, औषधं असा सर्व लावाजमा
घेऊन आम्ही हेलिकॉप्टर ची वाट बघत बसलो
    दुपारी 12च्या सुमारास घरर.. घरर असा मोठा आवाज करत
ते धूड खाली उतरले.
  सर्व सामग्री त्यात भरली गेली, आता कठीण प्रसंग होता तो म्हणजे आत चढण्याचा!!  त्यात आत जायला पायऱ्या, शिड्डी
वगैरे काहीच नसते. फक्त T  च्या आकाराचा लोखंडाचा खांब!!
   त्यावर पाय वर करून चढायचे!!
      वरून पडणारा पाऊस, एका हाताने साडी व बॅग सांभाळत
        कशी बशी आत चढले, मागून कोणीतरी अक्षरशः उचलून
आत ढकललेच असावे.
       मागोमाग माझे सहायक डॉक्टर देखील आत आले, व मग सुरू झाला आमचा "वायू प्रवास "
   वरून पडणारा धो.. धो.. पाऊस, हेलिकॉप्टर ची घरर.. घरर!
    खाली बघायची देखील भीती वाटत होती, जीव मुठीत घेऊन आम्ही सर्व गप्प बसलो होतो.
       श्रावण धारा, हिरवीगार धरा, कांदाभजी सर्व सर्व काही
विसरायला झाले होतें व त्याच वेळी कॅप्टन नें विचारणा केली
"खातेगांव आलेले आहें, आता कोठे जायचे??"
झालं!!!!आकाशातला रस्ता कां आम्हाला ठाऊक होता????
   हळूच खाली वाकून बघितले, चहू कडे पाणीच.. पाणी..
गावाचे तर नामो निशाण दिसत नव्हते पण गावाकऱ्यांना मात्र आमचे हेलिकॉप्टर दिसलें असावे कारण त्यांनी खालून लाल पताका दाखवण्यास सुरवात केली होती.
   हेलिकॉप्टर चा वेग कमी झाला व ते हळू हळू खाली उतरू लागले.  आता खाली पाण्याबरोबरच माणसं, झाडें झुडपे देखील
नजरेस पडू लागले पण पावसाचा वेग मात्र कमी झाला नव्हता.
हेलिकॉप्टर ला जमिनीवर उतरायला जागाच सापडत नव्हती,
शेवटी 3...4 घिरट्या मारून एका जागी "ते धूड "खाली उतरले.
   चढण्या एवढीच उतरायला देखील तेवढीच कवायत करावी लागली.
   वरून पाऊस, खाली चिखल!!  चप्पल चिखलात रुतली ती
शेवट पर्यन्त सापडलीच नाहीं.
   शेवटी गावकऱ्यांची सपाती घालून कसें बसे गावाच्या शाळेत
पोहोचलो व हेलिकॉप्टर आम्हा काही जणांना सोडून दुसऱ्या गावा कडे रवाना झाले.
  एव्हाना दुपारचे 2वाजून गेलें होतें पोटात कावळ्यांनी कावं.. कावं.. सुरू केली होती पण गावकऱ्यांनी प्रेमानें दिलेल्या गरमागरम गुळाच्या चहाने भूक भागवली व तरोताजा होऊन
  कामाला लागलो.
    पावसाचा वेग आता थोडा कमी झाला होता. पाण्याचे स्तर
वाढत नसले तरी कमी देखील होत नव्हते.
  सुरक्षेतेच्या दृष्टीने वृद्ध जनांना व जनावरांना सुरक्षित जागेवर हलवणे गरजेचे होतें.
     गावात एक शाळा थोड्या उंचीवर होती, तेव्हा सर्व संमतीने त्यांना शाळेत हलवण्याचा निर्णय घेतला गेला.
वृद्धासाठी शाळेत खाटा टाकून वॉर्ड तयार केला. त्याच प्रमाणे एका हॉल मध्ये लहानग्या बाळांना त्यांच्या आई समवेत ठेवले.
    सर्वात आत असलेल्या दोन खोल्यांमध्ये गाई, म्हशी, शेळ्या वगैरे बांधल्या.
     दुसरा टप्पा म्हणजे सर्वांचे परीक्षण करून औषधे देणे होतें.
   माझी टीम हे काम करण्यात तत्पर होती. गावातील काही उत्साही तरुणांच्या मदतीने दोन तासात सर्व काम आटोपले.
बरोबर आणलेले दुधाचे पॅकेट्स, बिस्कीट्स फूड पॅकेट्स वितरण करून झाले, तो पर्यन्त मान वर करायला देखील उसंत
मिळाली नाहीं
      श्रावण धारांचा वेग कमी झाला होता, मातीच्या सुगंधा ऐवजी शेण, गोमूत्राचे वास नाकात जात होतें. मला मनात हसू आले "हा पण एक श्रावणच ना??"
       तेवढ्यात गावातल्या काही पोरांनी आकाशात हेलिकॉप्टर
उडून जाताना बघितल्याची बातमी आम्हाला दिली.
    "अरे देवा... म्हणजे हेलिकॉप्टर आम्हाला न घेताच गेलें होतें.
   आता मोठ्ठा प्रश्न आमच्या समोर होता, रात्री त्या गावात मुक्काम करणे शक्य नव्हते व पावसामुळे सारे रस्ते बंद होतें.
  कसे कांय करावे हा विचार करत असतानाच सरपंचजीने एक तोड काढली "आपण जर होडीने नेमावर पर्यन्त गेलो तर कसे होईल??"
  विचार चांगला होता. माझ्या डॉक्टर्स ची टीम देखील ह्या पर्यायला सहमत झाली.
थोड्याच वेळात नावाड्याने होडी गावाच्या किनाऱ्याला लावली.
सर्वांचा निरोप घेऊन आम्ही नावेत बसलो "नर्मदा माँ "ची प्रार्थना केली व आमचा "जल प्रवास "सुरू झाला.
  पण.. थोड्याच वेळात "श्रावणधारा "वेगाने "माँ नर्मदा "च्या भेटी साठी येऊ लागल्या.
  वरून कोसळण्याऱ्या श्रावणधारा सुसाट्याचा वारा व खाली खळ.. खळ.. वाहणारी नर्मदा!
    नर्मदेचे एवढे रौद्र रूप मी कधीच बघितले नव्हते, मला तर भीतीने कापरेचं भरले.
    मनात देवाची प्रार्थना करत जवळ.. जवळ एक तास "जल प्रवास "करून कसें बसे नेमावर ला पोहोचलो.
   वरून धो.. धो.. पडणारा पाऊस, खाली गुढग्या पर्यन्त चिखल
अंगावर ओले चिंब कपडे!
नावेतून उतरणे म्हणजे देखील एक कठीण परीक्षाच होती.
आम्ही तर नर्मदेच्या कृपेनें होडीतून सुखरूप उतरलो पण आमच्या बरोबर असलेल्या आमच्या एका सह पाठीचा पाय निसटला व तो पडला.  नावाड्याने त्वरित त्याला पाण्यातून काढले पण त्याच्या पायाचे हाड मोडले होतें, त्याला उभे देखील राहता येत नव्हते.
    नेमावर रुग्णालयाची ऍम्ब्युलन्स मागवून त्याची रवानगी खातेगांव रुग्णालयात केली व आम्ही सर्वजण खातेगांवच्या
डॉक्टर कडे आलो.
   तेथे आल्यावर सर्व प्रथम स्वतःला कोरडे करून कपडे बदलले व त्याच्या बायकोने दिलेल्या ऊन.. ऊन आमटी भातावर ताव मारला. त्यावेळेस तो आमटी भात पंच पकवांना पेक्षा देखील अधिक रुचकर वाटला.
  ह्या सर्व गडबडीत रात्रीचे 11वाजून गेलें होतें, पाऊस देखील आता थांबला होता
आता गाडी मध्येच मस्त पैकी झोप काढू असा विचार करत आम्ही सर्वांचा निरोप घेतला व आमचा  "सडक प्रवास "सुरू झाला.
  दिवस भराच्या श्रमाने लगेच डोळा लागला.
    चेहऱ्यावर येणाऱ्या पावसाच्या थेंबाने झोप उघडली, बाहेर बघितले तर परत पाऊस सुरू झाला होता. मी अंगा भोवती पदर लपेटून घेतला व झोपेचा प्रयत्न करू लागले.
  करर.. कच्च.. ड्राइव्हर ने लावलेल्या ब्रेक मुळे झोप उघडली, बाहेर डोकावून बघितले तर चहू कडे पाणीच पाणी होतें.
    ह्या वेळेस मात्र "नर्मदा माँ "स्वतः न येता तिच्या सहायक नद्या आमची वाट अडवण्यासाठी आल्या होत्या.
   जामनेर दुदनी वगैरे नद्या भरभरून वाहत होत्या. पुलावरून भरपूर उंचीवरून पाणी वाहत होतें, पुढें जायची वाटच दिसत नव्हती. श्रावणधारांनी आम्हाला परत चहूबाजूनी घेरले होतें
ड्राईव्हर ने मग गाडी बाजुला उभी केली व आम्ही गाडीचे lights लावून बसलो.
मुसळधार पाऊस, काळा कुट्ट अंधार, रात किड्यांची किरकिर, मध्येच एखादे कुत्रं ओरडत जात होतें.
थोड्याच वेळात गाडीच्या lights नी देखील आमची साथ सोडली, आता फक्त आमच्या जवळ असलेल्या टॉर्चचाच सहारा होता.
लहानपणी दादाने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टी मनात घिरट्या घालू लागल्या. झाड्यांच्या फ़ांद्यावर चित्र विचित्र आकृत्या दिसू लागल्या. सर्व मनाचेच खेळ आहेत हे समजत असुनही उमजत नव्हते
"रिम झिम झरती श्रावणधारा "च्या गाण्याची जागा आता "भीम रुपी महारुद्र "नी घेतली होती जीव मुठीत ठेवून मनात मारुती स्तोत्राचा अविरत जप सुरू झाला.
मनात भलभलते विचार येऊ लागले. अनेकदा पुलावरून जीपगाडी वाहून गेल्याच्या बातम्या मनात येऊ लागल्या, जीव
अगदी रडकुंडीस आला होता.
सकाळचे पाच वाजून गेलें होतें मग मात्र इंद्र देवतेला आमची कीव आली असावी म्हणून किं कांय पण पावसाचा वेग कमी झाला, पुलावरील पाणी हळू हळू कमी होऊ लागले.
पूर्वे कडे पहाट फुटू लागली होती. सूर्य देवतेच्या आगमनाने सर्वस्त्र उजेड पसरला.
ड्राइवर ने खाली उतरून पुलावरच्या पाण्याचा आढावा घेतला व हळू हळू सुरक्षितरित्या गाडी पुलावरून काढली.
पहाटेच्या धूसर प्रकाशात पुढें डांबरी वाट चकाकत होती.
चार तास "सडक प्रवास "करून सकाळी 10..11. च्या सुमारास आम्ही देवास ला सुखरूप परत आलो.
      आता सर्व आठवले किं गंमत वाटतेय पण त्या वेळेस "ते 24तास "जीवनातले सर्वात कठीण होतें पण म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी "
त्या पूर्ण प्रवासात देव नक्कीच आमच्या बरोबर होतें!!


डॉ विद्या वेल्हाणकर
अंधेरी, मुंबई.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू