पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गरजेचं आहे!

नुसतंच आभाळ भरून येण्यापेक्षा 

पाऊस कोसळलेलाच बरा असतं,

मनातला उचंबळलेला डोह,

अधूनमधून रिता होणंच बरं असतं.

अपेक्षांचं ओझं झेपेल तितकंच घ्यावं,

जास्त जड झालं की झुगारणंच बरं असतं.

दुसऱ्यावरचा लोभ नेहमीच व्यक्त करावा,

पण कधी त्याच्यावरचा रागही दर्शवणं चांगलं असतं.

जबाबदाऱ्या वाहतांनाही आपल्यातलं मूलपणं विसरायचं नसतं,

गंभीरतेच्या बुरख्याआड कधी कधी अवखळ होणंही बरं असतं.

डोळे तुडुंब भरले की प्रत्येकदा मिटून घेणं जरूरी नाही,

मायेच्या कुशीत अश्रूंना वाट देणंही बरं असतं.

सगळे काही जसं चालतयं तसंच चालवणं गरजेचं नाही,

कधी कधी नव्या वाटा शोधणंही बरं असतं.

मनाच्या मशागतीसाठी व्यक्त होणं गरजेंच असतं.

वसंताच्या आगमनासाठी शिशिराची पानगळ होणं गरजेचं असतं.


अनघा जगदळे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू