पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

याला जीवन ऐसे नाव

सर्वांवरती प्रेम असावे 

मनी नसावा दुजाभाव 

सर्वांसाठी जगत रहावे 

याला जीवन ऐसे नाव ॥


मंदिर मस्जिद जरी वेगळे 

देव तयातील एक आहे

नमाज नमस्कार जरी वेगळे 

भाव तयातील एक आहे 

ईश्वर अल्ला दोन्ही एकच 

जरी वेगळे नाव ॥


झेंडे पताका जरी वेगळे

ध्येय तयातील एक आहे

नाव गाव जरी वेगळे 

प्रेम तयातील एक आहे

माणुसकीचा पान्हा फुटावा 

असा असावा भक्तिभाव ॥


तलवार सत्तूर जरी वेगळे 

धार तयातील एक आहे

चालवणारा जरी वेगळा 

वार तयातील एक आहे

सारा मानव एकच असता

का घालावा घाव ॥


भाषा प्रांत जरी वेगळे 

श्वास तयातील एक आहे

जाती धर्म जरी वेगळे

विश्वास तयातील एक आहे

काळे गोरे एकच असता

का पाळावा भेदभाव ॥


सर्वांवरती प्रेम असावे

मनी नसावा दुजाभाव 

माणुसकीला फासेल काळीमा 

असा नसावा वैरभाव 

सर्वांसाठी जगत राहावे

याला जीवन ऐसे नाव ।।


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू