पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ते सारे...

वाटले जे आधार मला ते सारे भिकार निघाले.....

समजले आपुले ज्यांना ते सारे गद्दार निघाले......


त्यांच्या फुलण्यासाठी काटेरी कुंपण झालो

वाटले जे सुगंध देईल ते सारे अंगार निघाले......


सोने म्हणून साठवत गेलो डोळे मिटून सर्वकाही 

उघडले डोळे जेव्हा ते सारे भंगार निघाले......


त्यांच्या उजेडाच्या आश्वासनावर मी सूर्याशी दुष्मनी केली

सोबतीस घेतले ज्यांना ते सारे अंधार निघाले......


जीवनाचे युद्ध मी जेव्हा लढण्यास तयार झालो

वाटले जे ढाल मला ते सारे तलवार निघाले......


काळजाच्या जखमांचे माझ्या त्यांनी कित्येकदा सांत्वन केले

मारली जी आज फुंकर त्यावर ते सारे वार निघाले.......


ज्यांच्यासाठी आयुष्यभर मी उदार बनून राहिलो

त्यांच्या उदारतेची वेळ आली तेव्हा ते सारे उधार निघाले......


श्री. संदिप पंडित सोमेश्वर 

९६५७८२८६८७

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू