पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

भाज्यांचे भांडण

रानात भाज्यांची स्पर्धा भरली

नंबरात फुलकोबी पहिली ठरली.


निकाल ऐकून वांगे जाम चिडले

परीक्षकाशी जाऊन भिडले.


कोहळ्याने घेतली लगेचं उडी

शेपूनेही बांधली स्वतःची जुडी.


इवल्याश्या मिरचीने लावली आग

भेंडी,बरबटीला आला सर्वांचा राग.


भांडणाला मग चढला जोर

सामील झाले लहान थोर.


बट्याट्याने घेतली वांग्याची बाजू

मग भांडण लागले जोरात गाजू.


आले,लसूण येता निकट.

सिमला मिरची झाली तिखट


फुलकोबी,पत्ताकोबी झाल्या एक

कारले एकटेचं राहिले नेक.


टमाटर घुसले वांग्याच्या गटात

पालकही होते कोबीच्या कटात.


फणसाने दाखवता टोकदार काटे

लपून बसले सारे बटाटे.


समोर दिसता हिरवी मेथी

वांग्याची झाली मोठी छाती.


शेवगा,भोपळा आले धावून

चकित झाले भांडण पाहून.


अंबाडीनं मधेचं मारला सूर

सगळ्या भाज्या झाल्या दूर.


कांद्याने शेवटी वाजवली घंटा

मिटून गेला सारा तंटा.


©® विशाल कन्हेरकर.

    निंभा.जि.अमरावती.

     मो.9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू