पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ध्वज तिरंगा माझा ....

.***ध्वज तिरंगा माझा !*** 


अभिमानाने उंच फडकतो ध्वज तिरंगा माझा

लाखोनी सोसल्या यातना , अर्पिले प्राण त्या करिता

प्रजासत्ताक दिनी तो दाखवी आदर्श लोकशाहीचा

ग्वाही कणखर आत्मनिर्भयतेची तो देइ स्वातंत्र्यदिनाला ॥१॥


रुप मोहक त्याचे , भावे सर्व जगास

रंग केशरी , प्रतिक कणखरपणा अन् ध्यैर्याचे 

शुभ्र धवल दाखवी , राष्ट्रतेज सत्य अन् शांतीचे

सुजलाम् , सुफलाम् , पवित्र भारतभु  , सांगे रंग हिरवा सर्वाना ॥२॥


तिनहि रंगांवर खुलुन दिसे

 " अशोकचक्र " तेजस्वि

सत्य , न्याय , देशाभिनाची जाणिव पाहुन त्या होइ

प्रांत अनेक , भाषा विविध , पोशाख भिन्न जरि आमचे

ज्योत देशाभिमानाची जाज्वल्य , मनामनातुन तेवते ॥३॥


'' जन गण मन '' हे गीत पवित्र आम्हा किती

नारा " वंदे मातरम् '' प्रिय प्राणाहुन हि

डौलात फडकतो " तिरंगा " उंच अंबरी

अभिमानाने पाहतो , हरेक हिंदुस्थानी ॥४॥


वंदन तिरंग्यास करूनि , शपथ एकतेची घेऊ सारे

प्राणपणास लावुनि रक्षिती मायभुमिस ,

नारा " जय हिंद " चा देऊनि ,

 स्मरण त्या विर जवानांचे करू सारे ॥५॥


      *जय हिंद , वंदे मातरम्* 


                              प्रदिप राजे 

                       २६ / १ / २०२१



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू