पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रावण आला

"श्रावण आला"


श्रावण आला श्रावण आला

ऊन सावलीचा संगम झाला.


क्षणात आले सरसर शिरवे

झाले ओले गवत हिरवे.


वाहू लागता वारे गार

धरती झाली प्रसन्न फार.


ढगांची धावपळ वाऱ्याचा मेळ

ऊन पावसाचा रंगला खेळ.


चहूकडे मग हर्ष प्रगटले

नदी,ओढ्यांचे सूर उमटले.


डोंगरमाथी हिरव्या शाली

गंधफुलांनी फुलल्या वेली.


मजेत हसला श्रावण थोडा

बहरून गेला निसर्ग भोळा.


©® विशाल कन्हेरकर.

  निंभा.जि.अमरावती.

  मो.9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू