पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हे सत्य विश्वव्यापी

देऊ तुला कशी मी माझी ती गर्द छाया 
एकेक पर्ण माझे रे लागले गळाया 

नौकेस भोक पडता पाणी शिरे तयात
उंदीर आतमधले रे लागले पळाया 

थोडी झुळूक मिळता मज एकदा सुखाची 
सुहृद आप्त सारे रे लागले जळाया 

अपुलीच सावलीही सोडून दूर जाते 
माथ्यावरील सूर्य जव लागतो छळाया

सारे सखे सुखाचे दुःखात दूर जाती
हे सत्य विश्वव्यापी मज लागले कळाया 

             कवी -- अनिल शेंडे .


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू