पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

घरकुल

 घरकूल 


असावे छोटेसे

घरकुल सुंदर

आई बाबांच्या

कष्टाचे मंदिर .......!!


सुख दुःखात असावी

त्याचीच छाया

सदैव असावी

आईची माया .........!!


आजी  आजोबा

सांगती कथा

राम कृष्णाच्या

पौराणिक गाथा ........!!


स्वप्नातले माझ्या

तेच घरकुल खरे

जेथे असेल

मायेचे झरे ........!!


आनंदी राहावी

तिथली मुलं

सदा दिसावे

हसरे घरकुलं..........!!


@विशाल कन्हेरकर

मो.9172298839

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू