पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुमच्या डॉक्‍टरांचे आहारतत्वांविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते

पुस्तक आढावा

पुस्तकाचे नाव -तुमच्या डॉक्टरांचे आहारतत्वांविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते

मूळ इंग्रजी लेखक- रे डी. स्ट्रॅण्ड (MD)

अनुवादक- डॉ. रमा मराठे

प्रकाशक- मंजुल पब्लिशिंग हाउस, नवी दिल्ली (www.manjulindia.com)


माझे मित्र गणेश खोबरे सर जे Vestige कंपनीचं काम करतात त्यांनी हे पुस्तक मला आवर्जून वाचा म्हणून खूप दिवसांपूर्वी दिलं होतं आणि आता ते पूर्ण वाचून झालं.मी स्वतः एक नवोदित कवी, लेखक झाल्यामुळे माझे ही लिखाण नेहमीच चालू असते, त्याचवेळेस इतर लेखकांची पुस्तके थोडा वेळ काढून नेहमीच वाचत असतो.पुस्तकाचे नाव बघितल्यावर लगेच वाचण्याचा प्रभाव पडत नाही, परंतु अनुवादक डॉ. रमा मराठे मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने अनुवाद केला आहे, जेणेकरून कोणत्याही वाचकाला पुस्तकाची भाषा उमगेल.

                 मूळ इंग्रजी लेखक हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित असं व्यक्तिमत्त्व असून ते देखील अगोदर न्यूट्रिशनल सप्लीमेंट्सवर विश्वास ठेवत नव्हते, परंतु त्यांची पत्नी लिझ लग्नाच्या दहाव्या वर्षातच थकवा, अॅलर्जी सायनुसायटिस आणि फुफ्फुसांच्या इन्फेक्शनने त्रस्त होती. ती घरगुती कामं देखील करण्यास असमर्थ होती.तिच्या एका मैत्रिणीने तिला न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स बद्दल सांगितलं आणि तिने शेवटचा एक प्रयोग म्हणून तो केला.काही महिन्यांतच तिला त्यांचा चांगला रिझल्ट आला. ती पुन्हा घोडेस्वारी करू लागली, तिच्यामध्ये एक नवी ऊर्जा, ताकत आली, नवा आनंद उत्साह संचारला.आपल्या पत्नीवर इतका चांगला प्रभाव पडल्यामुळे सात वर्षे या न्यूट्रिशनल सप्लीमेंट्सवर लेखकाने चांगला अभ्यास करून, संशोधन करून या पोषक तत्त्वांच्या कार्यामागील रहस्याचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे.

                     हे पुस्तक कुणी वाचावे?लेखकांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर मंडळी (कोणत्याही पॅथीची), हेल्थ केअर वर्कर्स, आहार शास्त्रज्ञ, आरोग्य सेवक तसेच इतर ज्यांना न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स विषयी माहिती हवी आहे आणि त्याचा योग्य उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे ती प्रत्येक व्यक्ती.

                   या पुस्तकात लेखकाने Clinical trials (चिकित्सा शोध)

यावर भर दिला आहे. न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स म्हणजे रोजच्या जीवनाला पोषक आहार तत्त्वांची जोड देणं. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार हे सर्व आजार मागील महत्त्वाचं कारण होय. खरी रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरातच असते, फक्त तिला अशा न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स देऊन आपल्याला मजबूत करणे गरजेच असतं.

                          लेखक तीस वर्षापासून फॉरेनला वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत.ते म्हणतात त्यांच्या अभ्यासक्रमाला कधीच आहारशास्त्र शिकवलं गेलं नाही, किंबहुना ते कोणत्याच आणि कुठल्याही विद्यापीठात शिकवलं जात नाही. फक्त रोगांची कारणे आणि तो कसा बरा करायचा? हेच सांगितलं जातं.त्यामुळे बरेचसे डॉक्टर ती रुग्णांना देत नाहीत, परंतु याचं थोडं ज्ञान अवगत करून आपल्या मेडिसिन सोबत ही न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स दिली तर त्याचा एक विलक्षण अनुभव रुग्णांना येतो हे सोदाहरण लेखकाने या पुस्तकात स्पष्ट केले आहे.

                      लेखकाच्या म्हणण्यानुसार Oxidative stress मुळे आपल्याला भयंकर आजार होतात. ते दूर करण्यासाठी आपल्याला अँटिऑक्सिडंट्स घेणं खूप गरजेचं आहे. ती आपल्याला कांही न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स मधूनच मिळतात. ती घेतल्यावर रोगप्रतिबंधन तसेच सळसळतं आरोग्य लाभतं.लेखकाने न्यूट्रिशनल सप्लीमेंट्सचा वापर प्रत्यक्ष सात वर्षे वेगवेगळ्या रुग्णांवर करून एक विलक्षण चमत्कार बघितला आहे आणि सत्यरुपात या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या दवाखान्यात त्याची सर्व कागदपत्रे व पुरावे उपलब्ध आहेत.

                 वेगवेगळी जीवनसत्वे कोणती? ते शरीरात कशा प्रकारे काम करतात? ती कोठून मिळतात? त्यांचा उपयोग कसा करावा? तसेच आहारातील वेगवेगळे घटक आणि त्यांचं प्रमाण किती असावं? कोणकोणती एलेमेंट्स काय कार्य करतात? याचं विस्तृत लेखन लेखकाने पुराव्यासहित केले आहे. त्यामुळे पुस्तकाची एक वेगळी विश्वासार्हता वाटते. पुस्तकात ह्रदय विकार, कर्करोग, स्वप्रतिरोधी आजार, संधिवात आणि ओस्टिओपोरोसिस, फुफ्फुसांचे आजार, मेंदूचे -हासकारी आजार, मधुमेह, जुनाट थकवा आणि फायब्रोमायाल्जिया,इ. रोगाविषयी न्यूट्रिशनल सप्लीमेंटला धरून विस्तृत ऊहापोह केला आहे.

                    Optimizers म्हणजे अत्यंत शक्तिशाली सिद्ध झालेले अँटिऑक्सिडंट्स. उदाहरणार्थ ग्रेप सीड एक्सट्रॅक्ट,बायोफ्लॅवीनाॅईड्स.न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स per day कशी द्यावीत किंवा घ्यावीत याविषयी देखील लेखकाने चार्ट मार्फत विस्तृत मार्गदर्शन केले आहे.

                   मल्टिपल स्क्लेरॉसिस, पॅरालायसिस अशी कितीतरी दुर्धर आजार केवळ न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स घेऊन बरी झालेली उदाहरणे लेखकाने दिली आहेत. त्यामुळे ते प्रत्येकाला ती नियमित घेण्याचा सल्ला देतात.आपल्याला जरी अॅलोपॅथिक औषधे चालू असतील तरी ही सायमलटेनिअसली आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्या अशी विनंती लेखक करतात.न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स कमीत कमी सहा महिने लगातार घेतल्यानंतरच रिझल्ट येतो असे ते म्हणतात.

                     संदर्भासाठी लेखकाने त्यांची वेबसाईट www. nutritional medicine.net ही पुस्तकात शहर केली आहे आणि ती सध्या चालू आहे. "An apple a day keeps a doctor away." याच्या पलीकडे ही आपण विचार केला पाहिजे असं लेखक म्हणतात.

                     आजकाल बाजारात अनेक कंपन्या न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स विकत आहेत, परंतु GMP सर्टिफाइड कंपनी निवडण्यास लेखक सांगतात. Vestige marketing private limited, New Delhi ही आपली भारतीय कंपनी सतरा वर्षापासून न्यूट्रिशनल सप्लीमेंट्स विकत आहे. तिच्या प्रोडक्ट्सचा रिजल्ट खूप चांगला आहे असे वापरलेले रुग्ण आवर्जून सांगतात.तुम्ही ती वापरा, परिवर्तन नक्कीच बघा आणि इतरांनाही वापरण्यासाठी प्रेरित करा.

                     विज्ञानातील स्नातक सोडून इतरांना हे पुस्तक थोडेसे कंटाळवाणी वाटू शकते, परंतु आहार शास्त्रातील ज्ञान मिळवण्यासाठी ते निश्चितच उपयोगी पडेल.प्रत्येक डॉक्टरांनी आणि सुज्ञ वाचकांनी हे पुस्तक माहितीस्तव वाचावे, तसेच त्याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी करावा असं माझं वैयक्तिक मत आहे.


©®-विश्वेश्वर कबाडे (नवोदित कवी, लेखक, अणदूर)

भ्रमणध्वनी-9326807480



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू