पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुम्हाला जिंकायचं असेल तर या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत...... - डॉ. चंद्रहास शास्त्री

तुम्हाला जिंकायचं असेल तर या पाच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत......

- डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

______________________________________________________

1. ध्येयाची कास सोडू नका. मात्र तुमचे ध्येय तुमचा अभिनिवेश होता कामा नये. जीवनातील प्राधान्यक्रमाची परिवर्तनीयता स्मरणात असू द्या.

        आपण एक ध्येय ठरवतो. त्या ध्येयासाठी स्वत:ला झोकून देतो. पण जीवन जगताना केवळ एक ध्येय म्हणजे सर्व काही असते का? तर नाही. आपल्या जीवनाचे अनेक पैलू असतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अशा स्तरांवर आपण जीवन जगत असतो. यातील प्रत्येक पैलू तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे जीवनात एका पेक्षा अधिक ध्येये, उद्दिष्टे असू शकतात. आर्थिक, शारीरिक स्वास्थ्य देखील महत्वाचे असते.

        आपल्या ध्येयपूर्तीसाठी चिकाटी हवीच. पण ती चीच्कती म्हणजे आपला अभिनिवेश म्हणजेच ego होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याच प्रमाणे काही ध्येयांच्या पूर्तीसाठी अधिक वेळ आवश्यक असतो. हा वेळ देताना जीवनातील प्राधान्यक्रम देखील विचारात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे हे तुमचे ध्येय आहे. मात्र हे ध्येय पूर्ण करताना आपल्या वयाचे भान आपल्याला ठेवावे लागते. अन्यथा वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊनही त्या संपत्तीचा आपल्याला उपभोग घेता येईल का, याचाही विचार करणे गरजेचे असते.

        या ऊपर एखादे ध्येय पूर्ण झालेच नाही, आणि ते ध्येय आपण आपला अभिनिवेश करून घेतलेला असेल, तर ते अपयश पचविणे जड जाते. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, पण अपयश आले तर आपल्याकडे अन्य योजना तयार असली पाहिजे.

2. थोडे पुढे गेल्यावर वाट चुकली असे ध्यानी आले तर मागे येण्यात कसलाच संकोच करण्याचे कारण नाही. अशावेळी लोकलज्जेचे ओझे बाळगून स्वतःवर अन्याय करू नये.

जसे इतरांवर अन्याय करणे चूक तसेच स्वत:वर अन्याय करणे देखील चूकच असते. समजा आपण ध्येयपुर्तीकडे वाटचाल करीत आहोत, त्यासाठी एखादा मार्ग निवडला, त्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत, पण थोडेसे पुढे गेल्यावर असे जाणवले की, आपली वाट चुकली आहे, किंवा ही वाट आपल्याला सुखावह नाही, तर आपण माघार घेतली पाहिजे. अशा वेळी लोक काय म्हणतील? असा विचार करून तीच वाट चालत राहणे म्हणजे आपण स्वत:वर अन्याय करण्यासारखे आहे. या पेक्षा मार्ग बदलावा. समजा, आपल्याला वाटले की, अमुक एक अभ्यासक्रम पूर्ण करून आपले भवितव्य घडू शकते. आपण त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो. तो अभ्यासक्रम पूर्ण करतो. मात्र नंतर असे लक्षात येते की, यातून आपले भवितव्य घडत नाहीये. तर केवळ लोक आपल्याला नवे ठेवतील, म्हणून अन्य क्षेत्रातील करिअरकडे पाठ फिरविण्यात कसला शहाणपणा आलाय? या उलट शक्य त्या आणि चांगल्या मार्गाने यशस्वी होणे योग्य होय. एकदा तुम्ही यशस्वी झालात की, लोक तुमचा सन्मानच करतात.

3. शेवटच्या श्वासापर्यंत आत्मविश्वास आणि श्रध्दा यांची जोपासना तुमचा जीवनप्रवास सुसह्य करू शकते.

आयुष्य म्हणजे केवळ चांदण्यातील सुखासीन प्रवास नसतो, तसेच आयुष्य म्हणजे केवळ गरम वाळूवरून चालण्याचाही प्रवास नसतो. सुखात असताना कृतज्ञतेची भावना आणि अवघड प्रसंगी आत्मविश्वास आणि श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा म्हणजे दृढ विश्वास. तो विश्वास आपला स्वत:वर हवा. तसेच शिक्षक, हितचिंतक, आराध्य यांचेवर असला तरी हरकत नाही.

4. अपरिहार्यता ही नैसर्गिक असते. थंडीत उबदार कपडे वापरावेत. तसे तिला सामोरे जाण्यात शहाणपण आहे. म्हणून जेव्हा एखादे कार्य आपण करू शकत नाहीत तेव्हा अनेक कार्यक्षेत्र आपली वाट पाहत आहेत; त्याकडे लक्ष पुरवा.

अपरिहार्यता म्हणजे अशी परिस्थिती ज्यात आपण एकटे बदल करू शकत नाही. तुम्ही एखाद्या रस्त्याने वाहन घेऊन जात आहात, आणि त्या रस्त्याचे काम सुरु असेल, तर diversion ही अपरिहार्यता असते. आपण थंडीत उबदार कपडे वापरतो. उन्हाळ्यात तलम कपडे वापरतो. आणि परिस्थितीशी समायोजन साधतो. अशाच प्रकारचे समायोजन आपण जीवनात क्षणोक्षणी, अगदी लहान प्रसंगात ते मोठ्या प्रसंगात साधत असतो. आणि साधायलाच हवे. आपल्यामध्ये अनेक क्षमता असतात. त्यांचा विचार करून अपयशाने खचून न जाता, विचारपूर्वक नवीन कार्यक्षेत्र निवडायला हवे.

 

5. अभ्यासाने अशक्य काही नाही. आणि  उत्साहाविना अभ्यास नाही. या सोत्साह अभ्यासालाच आमच्या ऋषींनी तप ही संज्ञा  दिली आहे.

अभ्यास म्हणजे निरंतर प्रयत्न. या प्रयत्नांचा आधार असतो, उत्साह. निरुत्साही होऊन प्रयत्न केले, तर आपली इच्छाशक्ती कार्य करू शकत नाही. म्हणून उत्साहानेच चांगला अभ्यास होऊ शकतो. सातत्यपूर्ण, एका ध्येयासाठी निरंतर उत्साहासहित प्रयत्न करणे म्हणजे तप होय. तप म्हणजे तपणे. अर्थात तपणे म्हणजे निरंतर प्रयत्नरत राहणे.  

        आपल्याला सर्वांना जिंकायचंय! आणि त्यासाठी आपण इतकं तर केलंच पाहिजे.

(क्रमश:)

***

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू