पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

* माय भवानी *

माय भवानी

 

गणपती आले आनंद कंद ,

दहा दिवस आमोद प्रमोद ,

गौरीआल्या घेऊनी आनंद ,

सवे मनी मंगल पुरवी छंद .

 

गौरीं तीनदिंस माहेर सोहळा,

बोळवतां मनभरे पाणडोळा,

कनवाळू ,सोडू नको अबाळा

जाऊनी परि,माहेर संम्भाळा.

 

नकोगे काळजी इतकी घेऊ ,

गेलेगे परि मन सांग कुठंठेऊ,

मनीगे माहेर समारंभ भरवूं ,

साठेगे हृदी ममत्व कुंठ ठेऊ.

 

थांब थोडा सा तग धरी माय,

पितरांना तव तृप्त करी जाय,

संतृष्ठझेप घेता तृप्त पितृगण,

मीयेते भूवरी संपूर्ण नऊदिन.

 

म्हणूनी माय भवानी ये भूवरी 

परिपूर्ण नऊ दिनी भक्तां घरी 

नऊरुप नित्य,नवशक्तीसंचरी

विलसे सूर्यकिरणां परि धरी.

 

फेडाया माहेर चे हृदी ममत्व ,

वरचे वरी झेले संकट सत्वर ,

भक्तांचे मुक्तकरी दूर्जटदुर्धर,

अनाथां अम्बे करुणा विस्तार.

 

 

सुलोचना बेलापुरकर

       * अपराजिता *

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू