पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नवरात्री आणि आजी

आजीचे लॉजिक


आजी म्हणजे सगळ्यांची Best Friend असते. तिच्या बटव्यात खुप सारी अनुभवाची शिदोरी असते. प्रत्येक गोष्टीत  ती लॉजिक लावण्याचा प्रयत्न करते.

रानात पिके तयार झाल्याने पुरुष मंडळी दिवसभर शेतात पहारा देत असतात. घरी यायला उसंतच नसते. म्हणुन ते जातांना आपल्या देवांना स्वतःच्या हाताने पूजा करून जातात.  नंतर वेळ  नसल्याने  पुर्ण पूजा न करता रोज एक माळ  मात्र नक्की वाहतात. झाली ना पूजा...

मागचे धान्य पुढील वर्षी पेरणी करायचे असते. त्याची trial घ्यायला  छोट्या टोपलीत माती भरुन ठेवली  जाते. काय लावायचे  असेल ते मुठभर धान्य  त्यात घातले जाते. त्याला थोडा प्रकाश  मिळावा म्हणुनच अखंड दिवा पण तिथेच लावला जातो. शेतकरी 9-10 दिवसानी घरी येईपर्यंत त्याला  बि कसे आहे,  ते पण कळते. मातीवर जो मातीचा घट ठेवला जातो, त्यातून  drip irrigation type पाणी पुरेसे झिरपत असते.  किती परफेक्ट टेस्ट करायचे..

पुरुष मंडळी  तिकडेच काहीतरी खाऊन राहत, मग बिचार्‍या बायका आणि मुले घरी...

बायका पण घरातील पावसाने दमट झालेले अंथरूण, पांघरुण धुण्यात, घराची साफ सफाई करण्यात व्यस्त होतात. पुरुष मंडळी घरी नसल्याने त्या उपवास करतात. म्हणजे हेल्थ पण जपली जाते आणि हलका आहार घेतल्याने सगळे कामे पण होतात...

किती विचार करुन हे सगळे ठरले आसेल ना....

खरेच वाटते हो हे सगळे लॉजिक...




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू