शेगावीच्या गजानना रे !
*॥ शेगावीच्या गजानना रे ॥*
गण गण गणात बोते
मंत्रोच्चार आम्ही नित्य करू
शेगावीच्या गजानना रे
प्रार्थना तुझी निशिदिन करू ॥१॥
हरावया दुःख दिनांचे
अवतरलास शेगावी
दावुनिया चमत्कार किती अनेक
विश्वास दाविलास भक्तांसी ॥२॥
शेगावीस दर्शनास जमति
ओढ लागुनि चित्ताला
अढळ श्रद्धा भक्तांची तुझ्यावर
धावुनि येशि हाकेला ॥३॥
गण गण गणांत बोते
मंत्र सदैव हृदयी उमटु दे
सेवा अखंड तुझीच घड्ड दे
कृपा सदैव मजवर राहु दे ॥४॥
मागणी न करतो आणखि
काही
मोह मनात तुझाच असु दे
संसाराला सावली आमच्या
गजानना ! नित्य सदैव लाभु दे ॥५॥
..... प्रदिप राजे , रोहा
२४/०२ /२०१९
३७ / २४ .०२ .२०१९
( स्व)