पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

क्षण आनंदाचे

सुख...


जे दुर्लभ आहे

ते अकस्मात सापडावे

या सारखं,

दुसरं सुख नाही..

तहान लागल्याशिवाय 

पाण्याचे महत्व कळत नाही!!


पावसाचे आगमन सुद्धा 

तितकेच सुखद असते..

धरित्रीला पडलेले ते

सुंदर असे स्वप्न असते!!


 म्हणून

दु:खाला कवटाळून

नुसते बसून राहू नये..

दु:खानंतर सुख येते

हे विसरून जाऊ नये!!

  

छोटे का होईना

पण क्षण आनंदाचे

यथेच्छ उपभोगावे..

मरणा नंतर आत्म्याने 

भटकत तरी का राहावे?

--सुनील पवार..✍????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू