पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कधि कधि ........

*कधि कधि ....*


कधि कधि उघडुन पहावी

जुन्या वहितील पाने

कधि कधि गुणगुणुन पहावे

जुने विसरलेले गाणे

कधि कधि चालताना पुढे

मागे वळुन बघावे

कधि कधि जुन्या वाटेवर

ओळखिच्या पावलाना शोधावे

कधि कधि आठवुन पहावे

स्वप्न जुने एकादे

कधि कधि चाचपुन पहावे

व्रण हृदयावरचे

कधि कधि शोधुन पहावे

अंधारातिल काजवे

कधि कधि मनि आणावे

तिचे उगाच लाजणे

कधि कधि सोडुन पहावे

गाठोडे आठवणींचे

कधि कधि टाकून द्यावे

जिर्ण वस्त्र पुराणे

कधि कधि विसरून जावे

मनाचे खळबळणे

कधि कधि पहात रहावे

संथ नदिचे वहाणे .....


             ......... प्रदिप राजे , पुणे

                     १६ / ०९ / २o२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू