पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अनंत चतुर्दशी

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या || धृ ||

जेंव्हा झाले तुमचे घरात आगमन

तेंव्हा प्रत्येकाच्या मनी शुभ स्पंदन

अश्रुपूर्ण नयनांनी देतो तुम्हास निरोप

होऊ दे कोरोनारुपी संकट कायमस्वरूपी लोप

एवढेच आमचे आज अनंत चतुर्दशीचे मागणे

पुनश्च येऊ दे खेळीमय वागणे

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या || १ ||

तुमच्या सोबत घेऊन जा आमचे अवगुण

द्या आम्हाला तुमचे गुण

तुमची रूपे अष्ट

कमी करा प्रत्येकाचे कष्ट

उधळू द्या पुन्हा गुलाल

होऊ द्या लाले लाल

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या || २ ||

वाजवू द्या ढोल

रिंगण करूनी गोल

खेळू द्या लेझीम

भर पावसात रिमझिम

करू द्या आम्हालाही हेका

धरू द्या फिल्मी गाण्यावर ठेका

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या || ३ ||


©®- विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर

भ्रमणध्वनी- ९३२६८०७४८०





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू