पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कया मदत हवे ते सांग न सके मला

काय मदत हवे ते सांग ना सये मला

काय मदत हवे ते सांग ना सये मला
भाजी चिरून देऊ की कांदा थोडा तुला
अर्धी अर्धी कामे आपण वाटून घेऊ थोडी
मी लावतो गॅस , तू गरम करशील पोळी?
हक्काने तू सांग ना ग  फॅन पुसायला मला
आणखी मदत हवे तर सांग ना सये मला

चुरगाळलेले बेडशीट मी करेन साधे सरळ
दूध उतू गेले तरर मी ...करेन  पळापळ
फरशी मात्र साफ कर, ते तुला छान जमते
मी साफ केली तरी तू पून्हा.. पुन्हा पुसते
अगदी वाटले तरमी अंगणी घालीनही सडा
आणखी मदत हवे तर सांग ना सये मला

जेवतानाही भांडी पाने मी आवरून घेतो
तुला वेळ नसेल तर मी वरण फोडणी देतो
कट्टा मात्र तुझा area ...तूच पुसून घेशील
थालपीठ ही छान खरपूस तूच भाजून देशील
फ्रीज आवरायला थोडी मदत करेन मी तुला
आणखी मदत हवे तर सांग ना सये मला

भाजी फळे , किराणा तो आणत जाईन मी
आणायचे काही विसरले तर परत जाईन मी
इस्त्री बिस्त्री काय असेल तर ते तू कर सये
तेलाच्या त्या किटलीत तेल तूच भर सये
जेवतानाचा एक घास भरवींन मी सये तुला
आणखी मदत हवे तर सांग ना सये मला

वैभव कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू