पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुख

सुख


सूर्याच्या सोनेरी किरणांनी सुंदर सकाळ होते. शेण गोठा,  चारा पाणी काहीही न करता अगदी ताजे दुध घरपोंच मिळते.

गरम चहा, ऐकायला हवीत तेवढी सुंदर गाणी मोबाईल वर येणार्‍या भरमसाठ शुभेच्छा.

अंघोळी साठी-मनसोक्त गरम आणी गार पाण्याची बरसात.

आपण घरात जिकडे बसू तिकडे फॅन, कूलर अणी एसी   वारा घालायला न कुरकुरता दिमतीला तयार... 

लाकूडफाटा नाहि कि धूर नाही, अगदि सहज गॅस वर जेवण तयार..

त्याही वर जेव्हा काही गरम हवे किंवा गार हवे, तर ओव्हन आणि फ्रीझ क्षणार्धात हजरच असतात..

दुपारचा निवांत वेळ घालवायला मोबाइल आणी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध असतोच...

पण मैत्रिणींनो ह्या बरोबर भरपूर रिकामा वेळ, आळस, आजार, अगदी फ्री ऑफ चार्ज  मिळते. जर रिकामा वेळ सत्कारणी लावला तर बाकीच्या दोघांना कधीच थारा मिळत नाही.   

आणी म्हणुनच  एखाद्या NGO/सामाजिक  संघटनेशी ( Innerwheel ) जोडले गेलो तर त्या आपल्याला खुप काहि देउन जातात. तुमच्या सुप्त कलागुणांना वाव देतात, आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग होतो, आजूबाजूला काय आहे ते कळते आणी  खुप काही शिकायला मिळते, जिवाभावाच्या मैत्रिणी मिळतात..

आणी ह्यापेक्षा मोठे काय सुख असते...



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू