पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी

✨????दिवाळी????✨


दिवाळीच्या सणाला लाख पणत्या पेटल्या होत्या
जिथे ती भूक शमलेली तिथे तेजाळल्या होत्या


समाधानात सुख असते असे म्हणतो तरी सुद्धा
अपेक्षा माणसाच्या मोठमोठ्या वाढल्या होत्या


कितीही गडगडत असला तरी पाऊस पडतो का
ढगांनी घर्षणाच्या मात्र शिक्षा भोगल्या होत्या


किती तो वागतो वाईट कोणाला कसे सांगू
खुणा माझ्याच हृदयातून साऱ्या खोडल्या होत्या


विसावा शांत मिळण्याला कुठे जाऊ कुठे राहू
सजा हृदयातल्या हृदयात निपचित रोखल्या होत्या

 

सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू