पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मला नको विचारू


मला नको विचारू 

की माझे अजूनही प्रेम आहे का तुझ्यावर? 

विचारायचेच असेल तर विचार 

उचंबळून येणाऱ्या त्या लाटांना 

ज्या अजूनही येतात वाळूच्या किनाऱ्यावर

फक्त एकदाच त्या सागराला स्पर्श करतात

अन् विखरून जातात नेहमीसाठी 


मला नको विचारू

की मी अजूनही आठवतो का तुला.. 

विचारायचेच असेल न तर विचार त्या

भरून आलेल्या कोसळणाऱ्या आभाळाला

धरणीच्या विरहाने व्याकूळ होतो

धो-धो बरसतो 

अन् विसावतो तिच्याच कुशीत नेहमीसाठी


मला नको न विचारू

की मी अजूनही तुझी वाट पाहते का? 

विचारायचेच असेल खरंच

तर विचार त्या चातकला 

बघत असतो तग धरून त्या नभाकडे

तहानलेल्या नजरेने दिवसरात्र

अन् स्वाती नक्षत्राच्या थेंबभर पाण्याने

तृप्त होतो नेहमीसाठी... 


मला नको विचारू काहीही

ह्या पेक्षा असे कर ना

बस निवांत समुद्राच्या किनाऱ्यावर

खेळ घटकाभर त्या लाटांसोबत

एकदा चिंब भिजून बघ पहिल्या पावसात

फक्त एकदाच टक लावून बघ 

माझ्या डोळ्यातील स्वच्छ आकाशात

कदाचित भरून येईल ते

तुला तृप्त करण्यासाठी...... 

अन् सामावून जाईन मी तुझ्यात

नेहमीसाठी..... 


ऋचा दीपक कर्पे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू