पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लालपरी

माझ्या महाराष्ट्राची लालपरी

कधी फिरंल सडकंवरी

नाही कुणासंगं तिची बराबरी

दखल घ्या कर्मचाऱ्यांची शासन दरबारी

रात्र नी दिवस ती धावते

प्रत्येक परिस्थितीत साथ देते

नाही बघते ऊन, वारा नी पाऊस

भागवते आमची हौस

दर हिचे योग्य

म्हणूनी गरिबांचे खुलते भाग्य

वाट काढते खेड्यापाड्यातूनी

थांबा घेते वाड्यावस्त्यातूनी

सुरक्षित हिचा प्रवास

म्हणूनी जनसामान्यांना हिचीच आस

काढा एकदा तोडगा

उगाच होतकरू कर्मचाऱ्यावर उगारू नका बढगा

फुल ना फुलाची पाकळी म्हणून उचला तुम्ही भार

मग होतील कर्मचारी गार

उशीर करू नका फार

आता समजूनी घ्या संघटनेचा सार

नाही तर चालू असेल लढाई आर-पार

मग बसेल महामंडळालाच फटका

म्हणूनी मार्ग लवकर उरका

©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती,अणदूर

भ्रमणध्वनी-9326807480


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू