पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जागरण/गोंधळ/garba

जागरण / गोंधळ / गरबा 

 

आजी म्हणजे सगळ्यांची Best Friend असते. तिच्या बटव्यात खुप सारी अनुभवाची शिदोरी असते. प्रत्येक गोष्टीत  ती लॉजिक लावण्याचा प्रयत्न करते.

बघा पाऊस संपून ऊन यायला चालु झाले की, शेतकर्यांच्या कामाला मोठा वेग येतो. धान्य कापणी साठी तयार होते. अगदि शेवटचे 10 ते 15 दिवस महत्त्वाचे असतात. तयार पिकाचे जनावरे आणी पक्ष्यांपासुन संरक्षण करणे जिकिरीचे असते. हे एकट्या दुकट्याने करण्या सारखे नसते. दिवसभर तो डोळ्यात प्राण आणुन लक्ष देतो. रात्रीचा पहारा मात्र एकटा करू न शकल्याने नवरात्री सारखे सण सुरू झाले. रात्री होणाऱ्या आरत्या, गरबा, जागरण, गोंधळ ह्या सगळ्यात मोठा आवाज आणी दिवे, मशाली असल्याने प्राणी आणि पक्षी नक्कीच घाबरुन जातात. शेतात आणी खळ्यात यायला बिचकतात. 

म्हणजे काय,?  सगळ्यानी मिळुन जगता पहारा दिला जातो. शेतकर्‍याची पिके व्यवस्थित घरी येतात.

बायकांना जरा बाहेर पण पडता येते आणी indirect मदत पण होते. पावसात कपाटात ठेवलेल्या कपड्यांचा कुबट वास येतो. त्या कपड्यांना अनायासे बाहेर काढले जाते,  ऊन दाखवले जाते, आणी बायकांची नटायची मुरडायची हौस पण होते. थोडा व्यायाम पण होतो. पिकांच्या रक्षणाला हातभार लागतो. देवीची स्थाने जरा उंचावर असल्याने, बॉडी chechk-up पण होऊन जाते.

खरच आपल्या   पूर्वजांचे साधे सरळ पण योग्यच लॉजिक होते. जे आपण आज पण नाकारू शकत नाही.

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू