पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पाणी

पाणी दोनच अक्षरे

बा आभाळाकडे बघायचा

नि धरणीत खपायचा

पाणी सांडलंच नाही

बा मात्र कोसळला कायमचाच अख्ख्या घरात साचलं आसवाचे पाणी

तेव्हापासून आभाळाकडे बघणच सुटलं कायमचं


शाळेत असताना सोसो आवाज करणारा विमान

आभाळातून जाताना बघितला की,  वाटायचे आता कोसळेल पाणी

पाणी कोसळलाच नाही

मायबापच तेवढे कोसळले.

विमान तरी कुठे कोसळतं?

ते तर हवेतच तरंगत...

"सर, विमान कस कोसळत नाही, हवेतच कस तरंगत....?"

मी विचारलं,

सरांच्याही डोळ्यात पाणीच पाणी.


कधीकधी पाणी अलगद कोसळायचा...

माडावर, ताडावर, नदी, बोळावर घराघरात साचायचा,

अख्खं जीवन या पुरात तुडुंब डूबायचे.

पुन्हा घर कोसळले, शेतीची माती नी माडयाही कोसळल्या.

राव आता शेतकऱ्यांनी आभाळाकडे बघणंच सोडलं...

धरणीचं गळ्यात बांधलेल डोरलं, कायमच विस्कटलं...सुटलं तुटलं,  या मायेचं,

पुन्हा मन झालं पाणी पाणी ...


कैक दिवस झाले आभाळाकडे बघणं सोडलं,

मात्र शतक ठोकणारा सचिन,

मान उंच करून वर बघतो आभाळाकडे,

पाणी आले असते तर...

शतक झालेच नसते

म्हणून मानतो आभार....

तर कधी अंबानीही बघतो आपल्या उंचउंच पंचतारांकित टावरकडे,

आभाळाला दान मागतो म्हणे,


सगळं उलटंच झाले राव... 

तेव्हा जीवाचं नाही होणार का पाणी पाणी? 

हीच तर आपल्या जीवनाची गाणी.


संजय येरणे, नागभिड,

मो.९४०४१२१०९८.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू