पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सय

रात्रीची भयाण शांतता

केवळ घड्याळाचे टिक-टिक

आणि गोंधळलेला मी

 

मनात तुझ्या आठवणी

त्या ही पुसट होत चाललेल्या

उरले फक्त फ्लॅशबॅक

 

क्वचित दिसतेस तू

फार-फार पुढे निघून गेलेली

ऐकू येण्याच्या पलिकडे

 

मग मी दारात बसतो

सभोवतालचे निर्जन न्याहाळीत

समोरची रातराणी खुणावते

 

चांदण्यात न्हालेली फुले

जणू मला चिडवीत विचारतात

“ती होती तरी का?”

 

समोरच्या टेकडीवरून

पहाट सावकाश घरंगळत उतरते

मला दंवबिंदु दंश करतात

 

मनावर झालेली जखम

तशीच भळभळत वाहते आणि

माझा अश्वत्थामा होतो

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू