पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गगन सदन तेजोमय - कोजागरी

गगन सदन तेजोमय 

 

नमस्कार मंडळी, 

 

आज कोजागरी. पोर्णीमेला आपल्या  तेजाने रात्रीचे आकाश तेजोमय करणा-या चांदोबाचे कौतुक करुन  मैफिल जमवण्याचा आजचा दिवस ( खरं म्हणजे दिवस नाही रात्र)

 

मैफिली पुन्हा जमवण्यास अनुकुल कालावधी  परत येत आहे . 

पुरे झालं ते "आँन - लाईन माया- जाल". चला  घरचा 'उंबरठा' ओलांडू हळूहळू . परत एकदा आपल्या सर्वांच्या वृत्तीही तेजोमय होऊ देत यासाठी सुरवातीला ही प्रार्थना:-

 

गगन सदन तेजोमय 

तिमिर हरून करुणाकर

दे प्रकाश, देई अभय 

 

गेल्या एक दोन मैफिली अगदीच  सुन्या सुन्या गेल्या, ते आँन-लाईन म्हणजे

 

'कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा ?

पुन्हा पुन्हा भास होत आहे

सुन्या, सुन्या मैफलीत माझ्या

 

पण आता पुरे, कारण

 

मी कात टाकली

मी रात टाकली,..

ह्या पंखावरती

मी नभ पांघरती

मी मुक्त मोरनी बाई चांदण्यात न्हाती

मी कात टाकली....

 

अशी मैफिल एकदा जमली की मग

 

कशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा

गेल्या हरवून दिशा झाले खुळे पाखरू

अंगी वणवा चेतला, मला कशी सावरु?

चांद मातला मातला

 

मंडळी, आजच्या या कोजागरीच्या निमित्याने ही वरील काही गाण्यांची जी  मैफिल सादर केली, ती  गाणी 'उंबरठा' आणि 'जैत रे जीत'  सिनेमातील स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेली आहेत 

 

 आज  आपण  कोजागरी साजरी करत असताना चंद्र   'रेवती' या नक्षत्रात आहे.   दक्षिणात्य अभिनेत्री 'रेवती' आणि स्मिता पाटील यांच्यात एक साम्य आहे, त्याबद्दल परत कधीतरी ???? 

 

रात बाकी, बात बाकी... 

हो ना हे जो 

हो ज्जाने दो

 

 

कोजागरीच्या शुभेच्छा 

 

( अमोल) 

१९/१०/२१

poetrymazi.blogspot.com

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू