पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दोन चंद्र

       " दोन चंद्र "


माझ्या पाशी आहेत दोन चंद्र

माझ्या पाशी आहेत दोन चंद्र.


एक आकाशात चमकणारा,

आणि एक माझ्या आयुष्यात झळाकणारा.


एक आपला रात्रीचा लाडका चंद्र

आणि दुसरा फक्त माझा जीव वृष चंद्र.


एक जगाला प्रकाश देतो

तर दुसरा माझ्या कुटुंबासाठी उजाडतो.


चंद्र आपल्या सगळ्यांचाच शीतल असतो,

माझा मात्र कधी कधी भयंकर तापतो


आकाशात तो चंद्र पंधरवडयाने कलेकलेने रूप बदलतो,

माझा वृष चंद्र आनंदात नेहमी सुंदर होत जातो.


म्हणे त्या चंद्रावर बरेच काळे डाग असतात

पण माझ्या चंद्रावर प्रेमाच्या फक्त खुणा दिसतात.


मला वाटते तो चंद्र आकाशगंगेत एकाजगी स्थिर असावा

तसेच माझा चंद्रही आयुष्यभर माझ्यासोबत कायम राहावाधन्यवाद.

कवी : श्री.लव गणपत क्षीरसागर

मो : 9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू