पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

डायटिंगमय घर

   रविवारचा दिवस होता  .सुमनची घरातील जास्तीची  सगसफाई सुरू होती . तेवढ्यात बंटी

(सुमनचे मोठे चिरंजीव )ओरडले ,

"आई ,ए ,आई ,आज संडे आहे ,तरीही माझी एक्साम

आहे .आज नेहमी सारखे पोहे ,नाहीतर उपमा नको

बनवु ब्रेकफास्टला .मस्तपैकी खमंग ढोकळा बनव ."

 

" नाही गं ममा ,नेहमी त्याचेच नको ऐकत जाऊ .

ढोकळा नाही .मस्त शिरा बनव ."ओम (लहाने चिरंजीव ) यांनी फर्मान सोडले .

 

आज नास्ता काय बनवायचा यावरून दोघा भावांमध्ये चांगलाच वाद सूरु झाला होता .शेवटी सुमनला मध्ये पडून वाद मिटवावा लागला .

 

" चूप बसा दोघेही .मी दोन्ही बनविते .ढोकळा करते आणि शिराही करते ." सुमन चे बोलणे ऐकून दोघे खुश झाले .सुमन नाश्त्याच्या तयारीला लागली .

थोड्याच वेळात पंकज आला .( सुमनचा नवरा )

 

"अगं , सुमन आज माझे जेवण नको बनवुस ,सुरेशकडे जेवायला जायचे आहे .अंघोळ

करून निघतो मी ." पंकज

 

"कोणत्या खुशीत जेवण आहे ,सुरेश भाऊजीं कडे  ?"

सुमनने गमतीने विचारले .

 

"त्याची बायको माहेरी गेली आहे ना - - -! त्या खुशीत -- - " त्याच गमतीने सुरेशने उत्तर दिले .तसे डोळे मोठे करून सुमनने त्याच्याकडे बघितले .तसा पंकज म्हणाला ,

" अगं ,वहिनी खरंच माहेरी गेल्या आहेत .म्हणुन आम्ही सर्वांनी मिरचीची भाजी अन भाकरीचा प्लॅन केला आहे .त्याची स्वयंपाक वाली भाकरी करून देणार आहे .आम्ही मस्त भाजी बनवू .किती दिवस झाले? एकत्र आलो नाही आम्ही ."

"बरं बरं ,नास्ता तयार आहे खाऊन जा ."सुमन

पंकज अंघोळ करून येतो .नाश्त्याची तारीफ करत

त्यावर ताव मारतो आणि निघुन जातो .

        दुपारी अडीच पर्यंत सुमनची कामे आटोपतात.

ओम कॉम्पुटरवर गेम खेळत होता आणि बंटी मित्राकडे गेलेला होता  .सुमनचा वर्तमानपत्र वाचता वाचता नुकताच डोळा लागला होता .तेवढ्यात,

आवाज येतो ,

आई ,अगं ,आई ,जरा बाहेर ये ,लवकर ये बरं ."

 

सुमन खाडकन उठते .तिला वाटते बंटीने काहीतरी

आफत आणली असेल .बेडरूम मधुन ,हॉल आणि तिथून बाहेर येईपर्यंत तिच्या डोक्यात ,बंटीच्या

लहानपणीची गंमत आठवली . लहान असतांना

बंटीला पाण्यात खेळायला फार आवडायचे .तो सारखा बाथरूम मध्ये जायचा म्हणून सुमन नेहमी

बाथरूम बंद ठेवायची .पण एकदा तो ,नजर चुकवून

बाथरूम मध्ये गेलाच .सुमन कामात गुंतली होती .

खूप वेळाने त्याचा रडण्याचा आवाज आला .आवाज

बाथरूम मधुन येत होता .तिकडे जाऊन बघते तर,

बंटी बाथरूम मध्ये लॉक झाला होता .त्याने आतून कडी बंद तर केली होती पण उघडता काही येत नव्हती .शेजारी जमा झाले .शेवटी बाथरूम च्या काचा फोडून ,तार टाकून ,त्याला बाहेर काढण्यात आले .बरे झाले एकही काच त्याला ,लागली नाही .

अशा कितीतरी करामती बंटीने केल्या होत्या .

   सुमनला वाटले आताही त्याने काही घोळ घातला

असेल .पण बाहेर येऊन बघते तर - - - बंटी एकदम

ठिक होता .पण त्याचे बाबा घामाघूम झाले होते आणि त्यांचा चेहराही पडला होता .नेहमी फुगलेल्या

फुग्यासारखा असलेला चेहरा आज ,त्यातील हवा ,कोणी काढली असेल ?

 

" अरे ,बंटी काय झालं ह्यांना - - ? चेहरा का असा

उतरला ."काळजीने विचारले

"आई ,अगं ,आधी घरात तर येऊ दे बाबांना .मग सांगतो सर्व ."बंटी

  सुमन आणि बंटी ,पंकजला घरात घेवून गेले .त्याला

सोफ्यावर बसविले .

"ओम्या बाबांसाठी पाणी आण ."मोठ्या दादाने लहान

भावाला ऑर्डर सोडली .तसा ओम पाणी घेऊन आला .पंकजने ते गटागटा पिले .सुमन ,पंकजकडे बघतच होती .बंटी बाजुला बसला होता .

 

"आई ,बसली काय ? फॅन सुरू कर ना - - ! "बंटी

 

"अरे ,हो ,करते ."म्हणून सुमन उठली .उठताना तिचा पाय ,पेटीकोट मध्ये अडकला ,पडता पडता वाचली .

तशीच इलेट्रिकच्या बोर्ड जवळ गेली .नवऱ्याच्या

काळजीने सर्व बटणं सुरू केली .टी .व्ही .,ट्यूब लाईट, झिरो लाईट सर्व सुरू झाले पण फॅन बंदच -!

 

"काय मेलं या फॅनला आत्ताच ,रोग आला .यांचा जीव

तिकडे जातोय  - -! हा मेला बंद पडला   - - !आता

काय करायचं - -?  सुमन

 

" आई काय केलंस - -? फॅनचे सोडून सर्व बटणं सुरू

केलेस .बघ जरा वर - - " बंटी

 

" अरे ,हो रे ,गडबडीत झालं असं " सुमनने फॅन सुरू केला आणि पुन्हा पंकज जवळ येऊन बसली .

   " आता सविस्तर सांग बंटी काय झालं ते - ," सुमन

 

"आई मी सनी कडून येत होतो ना - - ! तर बाबा बाईक स्टँड वर उभी करून एकटेच उभे होते .चेहरा

घामाघूम होता म्हणुन मी ,त्यांची बाईक तिथेच लॉक

करून ठेवली आणि त्यांना माझ्या गाडीवर घेऊन आलो .बंटी सांगत होता .

"ओम्या जा बरं बाबांची बाईक ,अभंग रेसिडेन्सी जवळ लॉक केलेली आहे ,घेऊन ये ."

 

    बाईक चालवायला मिळते ,या खुशीत ओम चाबी

घेऊन पळाला .बंटी म्हणला,

"आई बाबांना ताबडतोब डॉक्टर कडे न्यायला पाहिजे .असा अचानक घाम येणे बरं नाही ."

    बंटीला आपण उगाच नाव ठेवत होतो .किती काळजी आहे त्याला ,बाबांची - - ! सुमन मनात म्हणाली .बंटीच्या शब्दांनी तिचा ऊर भरून आला .

 

"काही झालं नाही मला .फक्त मित्रांसोबत बोलता

बोलता चार घास शिल्लक जेवलो .त्यामुळे ऍसिडिटी

वाढली असेल .तसेही या वयात ,थोडेही जास्त खाल्ले तरी अपचन होते .काही गरज नाही डॉक्टरकडे

जाण्याची  " पंकज

पण बंटी आणि सुमनच्या पुढे त्याचे काही चालले नाही .सुममने पटकन ड्रेस चढविला .पर्समध्ये पैसे

टाकले .निघुया म्हणाली .पंकजने शर्ट ची बटणं

खाली वर लावली तसा बंटी म्हणाला ,

"बाबा तुम्हाला काही झाले नाही म्हणता ना ? मग

हे काय आहे ? बरोबर लावा ती  ".

पंकज ,सुमन आणि बंटी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे

गेले .पंकजला चेक केल्यावर म्हणाले ,

"मी काही टेस्ट लिहून देतो ,तेवढ्या उद्या करून घ्या .

काळजी करण्यासारखे काही नाही .उद्या रिपोर्ट

घेऊन या मग बघू .तो पर्यंत या मेडिसिन घ्या .बरे वाटेल ."बंटी मेडिसिन घ्यायला गेला .ती दोघे घरी आली .

डॉक्टरांनी बऱ्याच टेस्ट लिहून दिल्या होत्या .शुगर,

थायोराईड ,हिमोग्लोबिन  ,कॅलसिअम इत्यादी .

घरी आल्यवर सुमन ,पंकजच्या मागे पुढे करू लागली .

"अहो ,तुम्हाला सरबत करू का ? थकवा जाणवत असेल तर ,पडा थोडावेळ .अहो ,डोकं दुखतंय का

तुमचं ? "अशा प्रश्नांनी तिने भंडावून सोडले होते .

एरव्ही चार आवाज देऊनही पटकन न येणारी सुमन

अशी मागे ,लागलेली बघून पंकज वैतागला .म्हणाला

," मला काहीच नको आहे .जे लागेल ते ,मी हाताने घेईल .जा तू तुझी काम कर ." सुमन चेहरा पाडून

निघुन गेली .

      पंकजने दोन दिवसांची सी .एल .घेतली .दुसऱ्या

दिवशी सकाळी पंकज टेस्ट करायला निघाला .

सुमन समोर आली .

"मी येते तुमच्या सोबत " सुमन

"कशाला ? माझ्या गाडीला ओझं वाहायला लावतेस ?

काही गरज नाही .मी एकटाच जातो ."पंकज जरा चढ्या आवाजात म्हणाला .तसा सुमानचा चेहरा पडला .ते पंकजच्या लक्षात आले .तो म्हणाला ,

"अगं ,आज तुझं काही काम नाही .कशाला ,घरातील

काम सोडून येतेस .रेपोर्ट आले की ,आपण मग डॉक्टरकडे सोबत जाऊ ."

    सुमनला ,पंकजचे म्हणणे पटले .ती कामाला लागली .संध्याकाळी रिपोर्ट घेऊन दोघे फॅमिली

डॉक्टरकडे गेले .रिपोर्ट बघुन डॉक्टर काय सांगतात त्याची उत्सुकता आणि काळजी सुमनला लागली होती .डॉक्टर म्हणाले ,

"काळजी करण्याचे काही नाही .तरीही माझा तुम्ही

हे रिपोर्ट एम .डी .डॉक्टर देसाई यांना दाखवा .माझे

मित्रच आहेत ते ,त्यांचे ओपिनियन घेणे ठिक राहील ."

"ओके ,ठिक आह" म्हणून दोघे घरी आले .

    दुसऱ्या दिवशी डॉक्टर देसाई यांची अपॉइंटमेंट

घेण्यात आली .दिलेल्या वेळेवर दोघे पोहचले .पण

इमर्जन्सी केस आल्यामुळे ,तिथे आणखी दोन तास

वाट बघावी लागली .तब्बल दोन तासांनी ,पंकजला

केबीनमध्ये बोलावले .त्याच्या मागे सुमन गेली .तिला

वाटले संपली एकदाची प्रतीक्षा .पण हाय देवा - -

" उघड दार देवा आता ,उघड दार देवा "

डॉक्टरांच्या मोबाईलची  रिंगिंग टोन वाजली .पुन्हा

प्रतीक्षा - - ! हे तर आता असे झाले होते जसे की

टी .व्ही .वर अख्तसी मुव्ही बघत असताना ,मुव्ही

रंगात येत असताना अचानक मोठा ब्रेक यावा तसे

झाले होते .पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी मोबाईल ठेवला आणि पंकजला चेक केले .त्यानंतर रिपोर्ट

बघितले .रिपोर्ट बघून म्हणाले ,

" तसे फारसे काही सिरीयस नाही गक्त थोडेसे

कॅलस्ट्रोल वाढले आहे .एक महिन्याच्या मेडिसिन देतो .एक महिन्यांनी पुन्हा या .एकदा वजन चेक करा ."

      पंकज वजन काट्यावर उभा राहतो ,त्याची नोंद

डॉक्टर घेतात .सुमनला मोह होतो वजन चेक करण्याचा .ती हळूच वजन काट्यावर उभी राहते .

मनात तिच्या वजनाची नोंद घेते .

    दोघे जाण्यास निघतात तसे डॉक्टर म्हणतात,

"तुमचे वजन थोडे कमी करावे लागेल .नाहीतर पुढे प्रॉब्लेम येईल .पहा पुढच्या महिन्यापर्यंत किती ,कमी

करता येईल ते ."

        घरी आल्यावरही पंकजच्या मनात वजन कमी

करण्याचे विचार घोळत होते .सुमन मात्र रिलॅक्स झाली होती .दोन दिवसांपासून मनात असलेले टेन्शन

कमी झाले होते .कारण पंकजचे रिपोर्ट नॉर्मल आले होते .त्याच आनंदात तिने रात्री मस्त ,पनीरच्या भाजीचा बेत केला होता .जेवण झाल्यावर पंकज

म्हणाला ,

"सुमन डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितले ना ?"कसे करायचे ?

 

"त्यात काय कठीण आहे - - ? तुमची आवडती गर्ल

फ्रेंड कचोरी आहे ना  - - तिच्याशी नाते तोडून टाका .

खास फ्रेंड समोसा त्याला बाय करा ,आपल्या घरी नेहमी मुक्कामाला येणाऱ्या पाहुण्या शिरा आणि भजी

यांना घरात एन्ट्री बंद करा .दर रविवारी तुम्हाला भेटायला येणारे तुमचे बावळट मित्र वेफर्स ,कुरकुरे,

खरमुरे ,बिस्किट्स यांना कायमचे हाकलून दया .

बस्स इतके जरी केले तरी ,वजन आरामात कमी होईल ." सुमन हसत हसत बोलली ,"आता जास्त विचार करू नका ,जा शांतपणे झोपा ."

   '  ठिक आहे ' म्हणून पंकज झोपायला निघुन गेला .

ती त्यांच्या पाठमोऱ्या आकारकडे पाहताच राहिली .

तब्बल बावीस वर्षाच्या संसारात आज पहिल्यांदा

पंकजने तिचे काहीही वाद न घालता ऐकले होते .

          दुसऱ्या दिवशी पंकज  ,ऑफिस मधुन

आल्या आल्या म्हणाला ,"सुमन ,उद्यापसून मी

डायटिंग करणार आहे ."

"अहो ,पण काय गरज आहे त्याची तुम्हाला थोडेच

वजन कमी करायचे आहे ."सुमन

"ते काही नाही .डायटिंग म्हणजे डायटिंग .मी येताना

आहार तज्ञांना भेटून आलो .एका महिन्यात दहा किलो वजन कमी करणार आहे ."

     सुमन काय बोलणार बापडी - - !

         राजा बोले तळ हाले .

"आणखी एक सुमन ,मॉर्निंग वॉक ला सुध्दा जाणार आहे ."पंकज

"अरे बापरे  ,आज तर सिक्स वर सिक्स मारणे सुरू आहे .यांच तर असं झालं - - - एखादा बॅट्समन प्रत्येक मॅच मध्ये दोन चार रन काढून आऊट होतो पण एखाद्या मॅच मध्ये चक्क शतक ठोकून शतक

काढुन मॅच जिंकुन देतो .अगदी तस झालं आज ह्यांच रोज साडे आठ शिवाय न उठणारे पंकज ,मॉर्निंग वॉक

साठी कसे उठतील देव जाणे -? "सुमन मनात म्हणाली .

पंकज सुमन जवळ येऊन म्हणाला ,

"सुमन ,उद्या पासूनचे जेवणाचे वेळापत्रक सांगतो ."

"हे काय नवीन आता ? मला बाई शाळेच्या तासिकांचे

वेळापत्रक ,रेल्वेचे वेळापत्रक  माहिती आहे ,जेवणाचे

वेळापत्रक - - ?"सुमन हसत म्हणाली

"अशी हसु नकोस ,ऐकून घे .सकाळी वॉक वरून

आल्यावर ग्रीन टी घेईल .त्यानंतर मोड आलेल्या धान्याची कच्ची उसळ .टिफिन मध्ये दोन सुळके आणि कमीत कमी तेलाची भाजी .घरी आल्यावर

पुन्हा ग्रीन टी आणि रात्रीच्या जेवणात भाकरी किंवा

ब्राऊन राईस .असे साधे ,सोपे वेळापत्रक आहे .कळले ?" पंकज

     डायटिंग साठी लागणाऱ्या वस्तू आणायला ,पंकज

निघुन गेला .सुमनला ग्रीन टी ची रेसिपी माहिती नव्हती .तिच्या डोक्यात ब्राउन राईस घोळू लागला .

मुव्ही बघून बघून ब्राउन शुगर तिला माहिती होती .

ती खूप महाग असते आणि त्याचे व्यसन लगते .

ब्राउन राईस त्यातलाच प्रकार असेल तर - -? आपल्या

नावऱ्याला त्याचे व्यसन लागले तर - - -? नको रे बाबा

ते डायटिंग -- 

सुमनचे विचार चक्र सुरू होते ,तितक्यात बंटी तिथे येतो .ती बंटीला विचारते ,

"बंटी हे ब्राउन राईस काय असते रे ? त्याचे व्यसन

लागते का ?"

"काही काय विचारतेस आई ? ब्राउन राईस हा

तांदुळाचा एक प्रकार आहे .तो पचायला हलका असतो .त्याचे व्यसन लागत नाही ."बंटी

दोघांचे बोलणे सूरु असतांनाच पंकज येतो .

बंटी ,बाबांनी आणलेल्या वस्तू पैकी शूज आणि चप्पल बघतो,

"बाबा ,शूज मस्त आहेत .चप्पल ही मस्त आहे ."बंटी

 

"शूज मॉर्निंग वॉक साठी आणले ."पंकज

"हे शूज वॉक साठी - - -? यांनी तर तुमचा पाय मुरगडेल .हे घालुन तुम्ही अजिबात वॉक ला जाऊ नका .काही दिवस चप्पल घालुन जा .मी तुमच्यासाठी

ऑन लाईन स्पोर्ट्स शूज मागवतो .हे ऑफिस साठी वापरा ."बंटी

पोर बरोबरीची झाली की ,त्यांच्या मताने घ्यावे लागते .एव्हाना पंकजच्या डायटिंग ची चर्चा घरात

चांगलीच रंगात आली होती .ओम यू ट्यूब वर सर्च

करून पंकजच्या ज्ञानात भर घालत होता तर बंटी त्याची टर्र उडवत होता .ओम म्हणाला,

"पप्पा तुमचे दहा किलो वजन कमी झाले की ,तुम्ही

मस्त टी  शर्टस घालत जा .एकदम हँडसम दिसाल .

फक्त ही ढेरी आत गेली पाहिजे ."

    सुमनला विस वर्षाआधिचा पंकज आठवला .

एकदम उत्साही ,सडपातळ ,बोलका .वजन

वाढल्याने तो आता जरा सुस्तच झाला होता .डायटिंग मुळे जर पूर्वीचा पंकज पुन्हा मिळत असेल तर मदत नको का करायला ?उद्या डायटिंगचा पहिला दिवस

यथासांग तयारी करायला हवी ,म्हणतात ना वेल

बीगिनींग इज हाफ डन ,या म्हणीनुसार जोरदार तयारी सुरू होती .पंकजने सकाळी जाग यावा म्हणुन

मोबाईल मध्ये अलार्म लावुन ठेवला होता .सुमनने

नाश्त्यासाठी भिजवायला मूग काढून ठेवले होते .

      आता हे डायटिंगमय घर झोपी गेले होते .सकाळी

नेहमीच्या वेळेवर सुमनला जाग आली .बघते तर सर्व

गाढ झोपलेले .मॉर्निंग वॉकचे लक्षात येताच ती,

पंकजला उठवते .

"ही ,काय उठवायची वेळ झाली का ?चार साडे चारला उठवायचे ना ?" पंकज चिडला होता .

सकाळी सकाळी वाद नको म्हणून सुमन म्हणाली

"तुम्ही अलार्म लावला होता ना - - ?"

अलार्म का वाजला नाही ? म्हणुन पंकज मोबाइल

चेक करतो .ए.एम .ऐवजी पी .एम .सेट झाले होते .

स्वतःची चुक असल्याने तो गुमान तयार होऊन वॉकला गेला .उशीर झाल्यामुळे पंधरा मिनिटात,

परत आला .या पंधरा मिनिटांच्या वॉकने सुध्दा त्याला

चांगलाच घाम फोडला होता .आल्याआल्या त्याने

ग्रीन टी ची ऑर्डर सोडली.

"आई ,मला क्लासला जायचे आहे ,चहा कर पटकन "

तिकडून बंटीची ऑर्डर आली .बिचारा गॅस किती

ऑर्डर्स पूर्ण करत असतो एका दिवसात - - - !सुमन

एका शेगडीवर हिरवा चहा आणि दुसऱ्या शेगडीवर

आपला पारंपरिक चहा ठेवते .हिरवा चहा ,ती तिच्या

डोक्याला ताण देऊन बनविते .पंकजला देते .इकडे

बंटीचा चहा गाळते .त्याला आवाज देते .पंकज एक

घोट चहाचा घेतो .ग्रीन टी ची चव ,त्याचे तोंड सहन

करत नाही .आत गेलेला चहाचा घोट तसाच बाहेर येतो .स्वच्छ पुसलेली लादी खराब करतो .नेमकी त्याच वेळी बंटीची एन्ट्री किचनमध्ये होते आणि - - -

जे व्हायला हवे तेच होते .बंटी त्या हिरव्या पाण्यावरून धडदिशी पडतो .

"आई ,अगं आई "करत विव्हळतो .त्याला हॉल मध्ये

नेतात .त्याच्या पायाला ,कंबरेला सुमन मूव्ह चोळते .

त्याला फारसे लागले ,नाही म्हणुन ठिक .किचन साफ

करता करता ,सुमानच्या मनात विचार येतो .'बरे झाले

मोठे चिरंजीव पडले .ते जरा दणकट आहेत .लहाने

पडले असते तर एखादे हाड नक्कीच मोडले असते .

मग मला डायटिंग सोबत प्लास्टरिंग सुध्दा सांभाळावे

लागले असते .

        आधीच उशीर झाल्याने ,सुमन फुलके करायच्या

भानगडीत पडली नाही .भिजवलेले कच्चे मूग खाऊन

टिफिन घेऊन पंकज ऑफिसला गेला .संध्याकाळी तो

लंगडतच घरी आला .

"अहो ,डायटिंग मुळे ग्लानी आली का ?कुठे चक्कर

येऊन पडले तर नाही .तरीही मी सांगत होती .ते

डायटिंग - - "सुमनला मधेच थांबवत पंकज म्हणाला

,"डायटिंग चे काही नाही .नवीन चप्पल चावली आहे .

त्यामुळे चालतांना त्रास होत आहे .बाकी काही नाही ."

  "तुमचा हिरवा चहा ठेवू का - -? "सुमन

सकाळच्या ग्रीन टी मुले , बंटीला दुखापत केली ,तो

तमाशा आठवून पंकजने ग्रीन टी ला त्याच्या

डायटिंग मधुन बाद करुन टाकले .बरेच झाले - - !

सुमानच्या मागची पिडा गेली .रात्रीच्या जेवणात,

ब्राउन राईस बनविला .सोबतीला पापड ,लोणचे आणि तडका दिलेले वरण होतेच की - -

       अशा प्रकारे डायटिंगचा पहिला दिवस पार पडला .दुसरा दिवस उजाडला .चप्पल चावल्यामुळे

मॉर्निंग वॉकला उठायचा प्रश्नच नव्हता ,.पंकज आरामात साडे आठला उठला .पारंपरिक चहा पिला .

वर्तमानपत्र वाचत  बसला .आज सुमनची खरी सत्व

परीक्षा होती ती ,फुलके बनविण्याची .आजपर्यंत

तिने कधीच ते बनविले नव्हते .तिला गोल ,तेल लावून

शेकलेल्या ,मऊसूत पोळ्या करायला आवडत .तिच्या

हातच्या पोळ्यांची सर्वत्र चर्चा असायची .तिचे सासरे

तर नेहमी म्हणायचे ,"पोळ्या खाव्या तर ,सुमानच्या

हातच्या ,त्याच्या सोबत काही नसले तरी चालते .तशीच पोळी खाल्ली तरी पोट भरते ."

     छोटीशी पोळी लाटणे ,ती तव्यावर शेकने, मग

भाजणे ,फारच जिकरीचे काम .पण वीस बर्षांपूर्वीचा

पंकज ,डोळ्यासमोर पाहून ,सुमन सर्व करत होती .

कसेतरी दोन फुलके केले ,ते जरा कडकच झाले .

शेकताना तिचे हातही भाजले .पण केले --- - - -

       दोन तीन दिवसात पंकजच्या डायटिंग ची बातमी

ऑफिस सोबत शेजारीही पसरली होती .वनिता

मॅडम ,पंकजच्या कल्लिंग त्याचा टिफिन बघुन रोज

आग्रहाने त्याला ,त्यांच्या टिफिन मधली एक पोळी

देत होत्या .तो नाही म्हणायचा.

"घ्या हो ,पंकज सर .एका पोळीने आणि थोड्या भाजीने काही होत नाही ."वनिता

वनिताचा प्रेमळ आग्रह पंकज मोडू शकत नव्हता .

वनिताने दिलेली पोळी तो ,तितक्याच प्रेमाने खायचा .

ते बघुन सुरेश त्याची थट्टा करायचा,

"आम्हालाही सुरू करावे लागेल ,तुझ्यासारखे डायटिंग ."

ओमचे अधून मधून पप्पांना सल्ले देणे सुरूच होते .

शेजारच्या जाधव काकु पंकजचे डायटिंग आहे म्हणून

दर रविवारी त्याच्यासाठी कधी भजी ,कधी पावभाजी

,इडल्या आणून देत होत्या .

बंटी म्हणायचा ,"बाबांचे डायटिंग सुरू आहे ना - ? "

"असू दे रे ,रोज रोज ,डायटिंग करून पंकज सोकला

आहे रे .एका दिवसाने काही नाही होत ."जाधव काकु

 

समोरच्या घरातील ,माधुरी एक दिवस त्याला म्हणल्या

,"थोडे स्लिम दिसता ,डायटिंग करता वाटले ."

त्या एका वाक्याने पंकजचा डायटिंगचा उत्साह आणखी वाढला होता .

       डायटिंगची गाडी आता रुळावर आली होती .

फक्त मॉनिंग वॉकचा मुहूर्त अजुन झाला नव्हता .

सुमन चांगले फुलके बनवायला लागली होती .पण

तिची मात्र दमछाक होत होती .पंकजसाठी कमी

तेलाच्या भाज्या ,मुलांसाठी चमचमीत भाज्या .

सकाळ ,संध्याकाळ ,रोज दोन प्रकारचा स्वयंपाक

करणे कठीण काम असते .त्यात कधी कधी रात्री

कडधान्य भिजवायचे राहून गेले की ,मध्यरात्री सुमनला जाग यायची ,तेव्हाच ती उठून भिजवत घालायची .अशाने तिची झोपही नीट होत नव्हती .

तारेवरची कसरत ,संपत आली होती .आता उत्सुकता

होती ती ,रिझल्टची ,- - - !

        डॉक्टर देसाई यांची अँपॉईंटमेंट घेऊन ,सुमन

आणि पंकज ,त्यांच्या क्लिनिकला  गेले .मागच्या

वेळीस बराच वेळ गेला होता पण आज लवकर नंबर लागला .केबिनमध्ये गेल्यावर ,सर्व चेक अप झाले .

डॉक्टरांनी काही जुजबी प्रश्न विचारले ,

"झोप येते का ?"डॉक्टर

 

"हो 'पंकज

 

"जेवण ? "

"आणखी काही त्रास ?"डॉक्टर

 

" नाही सर "पंकज1

 

"ठिक आहे ,वजन करून घ्या ."डॉक्टर

 

पंकज वजन काट्यावर उभा राहिला .काटा  जो

उठला तर ,तो एकदम चौऱ्याऐंशी वर येऊनच थांबला .तो पंकजकडे बघुन हसु लागला ,पण

त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते .ते बघुन

डॉक्टर त्रासीक नजरेने म्हणाले,

" हे काय आहे मिस्टर पंकज -   ?वजन  चक्क सहा

किलोने वाढले आहे तुमचे - - - - ! इट्स नॉट गुड - -

यू आर केअरलेस  - -! आता पुढच्या महिन्यापर्यंत आधी हे वाढलेले वजन कमी करा ."

 

"यस ,सर  ,नक्की करतो ."खाली मान घालुन पंकज

म्हणाला .

 

      बाजुला उभी असलेली सुमन ,हे सर्व पाहत होती .मनात विचार करत होती .वजन वाढले तरी

कसे - -? ब्राउन राईस ने वाढले असेल का ? की मला

फुलके जमले नसतील - ? की वॉकला  गेले नाहीत

म्हणुन वजन वाढले असेल ?

       तिचा  विचार होईपर्यंत ,पंकजने तिला चल म्हटले .तिने हिम्मत करून डॉक्टरांना विचारले,

"मी वजन करू का ?"

  त्यांनी मानेने होकार भरला . वजन काट्यावर उभी

राहिली आणि काय आश्चर्य- - -? काहीही न करता

तिचे वजन चार किलोने कमी झाले होते .ते पाहून

पंकज खजिल झाला .

   दोघेही घरी आले .मुलांनी काय झाले ? वजन किती

कमी झाले ?डॉक्टर काय म्हणाले ?असे नाना प्रश्न

विचारले .सुमनने घडलेल्या सर्व घटना ,हसून हसून

सांगितल्या .मुलंही तिच्यात सामील झाले .

    ते बघुन पंकज चांगलाच चिडला .

"हसा हसा ,माझ्यावर .तुम्हाला कोणाला माझी काळजीच नाही ना ? माझी मदत करायची सोडून

हसताय ."पंकज

ओम म्हणाला ,"पप्पा अपयश ही यशाची पहिली

पायरी असते .या महिन्यात अपयश आले म्हणुन काय

झाले ?आपण पुन्हा प्रयत्न करू . आता आपल्याला

सोळा किलो वजन कमी करायचे आहे .""

" हो बाबा ,उद्यापसून मी येतो ,तुमच्या सोबत जॉगिंग ला "बंटी

        सुमनचे घर पुन्हा नव्याने डायटिंगमय झाले होते अन तिच्या डोळ्यासमोर विस वर्षा पूर्वीचा पंकज दिसु लागला .रिझल्ट काय येतो ,हे कळेलच तीस दिवसांनी .

     तोपर्यंत तुमच्याकडे काही डायटिंगच्या टिप्स

असतील तर जरूर कळवा .

 

सौ संगिता ताथोड

 

,

 



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू