पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कधी कधी

"कधी कधी"

 

पडतात काळजाला भेगा कधी कधी

वाटतोय जीवनाचा त्रागा कधी कधी.

 

जीवना तुझे किती रंग असे निराळे

बहरती जीवनाच्या बागा कधी कधी.

 

जुळतात भावबंध त्या अनोळखी नात्यांचे

तुटतात स्वकीयांचे अनुबंध कधी कधी.

 

चेहऱ्यावरी कधी ते दिसे भाव सुखाचे तृप्त

फुटतोय आसवांचा फुगा कधी कधी.

 

सुखाची सावली अन दुःखाचे गर्द मेघ

बदलती जीवनाच्या रेषा कधी कधी.

 

©® विशाल कन्हेरकर.

   मो 9172298839.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू