पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुम्हीच ठरवा

फेसबुक चाळता-चाळता अनिलच्या पोस्ट वर जरा थांबले. लक्ष्मीपूजनाच्या पोस्ट मधे बर्थडेची टोपी वगैरे लावून केक कापतांनाचा फोटो होता. सोबत त्याच्या भावाची बायको पण होती. बरेच दिवस झाले, अनिलशी बोलणे झालेच नव्हते, मी त्याला फोन केला.
विचारले, "का रे यंदा छान दिवाळीच्या दिवशी तुझा वाढदिवस साजरा झाला, वा! बीलेटेड हॅप्पी बर्थडे! तुझ्या भावाच्या बायकोचा पण वाढदिवस होता वाटतं."
"ही आमच्या आई साहेबांची कृपा" अनिल मोठ्याने हसला. म्हणे "तीचे वय आता नव्वद! का कोण जाणे दिवळीच्या दिवशी सकाळ पासून जिद्दच धरली की आपल्याला आज तुमच्या दोघांची एकसष्ठी साजरी करायची आहे! आता मी सदुसष्टचा! आणि आशाची तर आत्ता कुठे पन्नाशी उलटली आहे. आईला समजविण्याचा खुप प्रयत्न केला पण ती कही ऐकेना. रुसून बसली.
शेवटी माझा मुलगा आणि पुतण्या म्हणाला, कशाला दिवाळीच्या दिवशी तिचा मूड घालवायचा? आणू यात ना केक. नाही, मला कळतंय की हे खूप इललॉजीकल आहे..पण..काय बिघडतं?? यंदा दिवाळीला जरा डिफरंट गोड... मग काय आजी बाईंची कळी खुलली! संध्याकाळी लोक फटाके उडवीत होते आणि आमच्या घरी रसमलाई केक कापला जात होता... आमच्या साठी विचित्र होतं, पण  तीच्या  नातवांचे म्हणणे होते, ह्या वयात तीची इच्छा पूर्ण करणे जास्त महत्त्वाचे!"
*********************************

अनुजाच्या घरी गेले होते, सहज भेटण्यासाठी. गप्पांच्या ओघात तिने तीचे मन मोकळे केले.  किरकोळ गोष्टी वरून तीच्या बहिणीचे व तीचे काही क्षुल्लक वाद झाले, भांडण नव्हेत. काय तर फक्त दोघींचे तत्त्व जरा वेगळे. "मी ते एवढे मनात ठेवले नाही, वादावादी होते, पण ताई एवढा राग करून बसली आहे. आता कोरोनामुळे आई तिथेच अडकली आहे, तीला माझी खूप आठवण येत आहे.. माझ्या घरी वृद्ध सासू सासरे असल्याने मला काही एवढा लांबचा प्रवास करून तीला भेटण्यासाठी जाता येत नाही. बाबा गेल्यानंतर ती बरीच खचली आहे. तीचे चित्त तीच्या सर्व मुलांमध्ये अडकलेले आहे. कोरोनामुळे भेटी गाठी होतच नाहीये....
आता बघ ना, दोन दिवसा आगोदर ताईने अख्ख्या कुटुंबासोबत गाडी करून बाबांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने एका धार्मिक स्थळाला भेट दिली. माझ्या शहरातूनच होत गेली, पण जरा गाडी वळवून माझ्या घरी आली नाही! मला नंतर समजलं. विचारले तर म्हणे, वेळच नव्हता. अगं जरा वेळ काढून निदान आईची आणि माझी भेट घडवून दिली असती, आईचा किती जीव तुटला असेल... एवढा पण काय तो राग... "
सांगता- सांगता अनुजाचे डोळे भरून आले.
********************************
दोन दिवस, दोन प्रसंग.
काही तरी विचित्र वागून सुद्धा एखाद्या जिवंत वृद्ध माणसाची इच्छा पूर्ण करणे बरोबर की देवाघरी  गेलेल्या माणसासाठी पुण्यधर्म करून, जे आहे त्यांचे मन मारणे बरोबर?? तुम्हीच ठरवा. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू