पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती आणि मी

ती आणि मी

पाहता गावकुसाबाहेर ची ती वस्ती,

माझे मनच मला पुसती

काय अंतर ते तिच्या नि माझ्या मध्ये ?

मी उंबऱ्यातील लक्ष्मी शालीन,

ती रंग ल्यालेली आकृती मलीन

मी अंगणातील तुळस,

ती माळावरची बाभूळ

माझ्यासाठी रेखीव कट्टा,

तिच्यासाठी मात्र लागतो सट्टा

माझ्याभोवती पवित्र धुपाचा दरवळ,

तिच्याभोवती घाणीच्या किड्यांची वळवळ

काय झाले ? कसे झाले?

फसगत झाली अन् जागा चुकली

एक फूल देवाच्या पायावर चढले,

तर दुसरे जगाने पायदळी तुडवले.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू