पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रद्धांजली

श्रद्धांजली

 

दाटूनी भाव येती,

 बातमी ऐकताना

घेऊन काळ गेला

 बिपीन रावतांना

 

सवेची त्याने नेली

सहधर्मिणी ही त्यांची

विचित्र ही करणी

अधम यमधर्माची

 

आणखीही गेले संगे 

अकरा उच्च पदस्थ 

वायुयानही जळले 

की निमित्त अपघात 

 

प्रचंड कार्य घडले 

सेवा कालावधीत 

शत्रू अनेक असतील

जे होते भयचकित

 

रणनीतीस सापडेना

त्यांना तोड खचित 

म्हणून अवलंबिला

का भ्याड मार्ग दुष्ट? 

 

आज भारत मातेसह 

जनमानसही शंकित 

शंका सकल मानसी

अपघात की घातपात?

 

सेनाच घेईल बदला

नक्की संधी मिळताच.

हाच विचार देईल

शांती पुण्यात्म्यास

 

श्रद्धांजली हीच

त्या नरवीरास

प्रार्थना ही अमुची 

त्या परम ईश्वरास

 

वीणा कानतुटे 8/12/2021

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू