पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तो एक दिवस

     तो एक दिवस
_________________

मी मोठ्या शहरात राहतो आमचं "आठ - कोणी" कुटुंब आहे म्हणजे माझे काका - काकू , आई - बाबा ,माझी एक ताई , दोन दादा आणि मी. 
माझे आजी - आबा गावाला राहतात . ते वर्षा तून दोन तीनदा येतात एकाध महिना राहतात आणि परत गावी जातात. 
         ही गोष्ट आपल्या देशात लॉक डाऊन लागलं तेव्हां ची आहे. सर्व शाळा , ऑफिसेस बंद झाले आणि बाबा आणि काका घरून काम करू लागले तसेच आमची सर्वांची शाळा पण घरातच म्हणजे लॅपटॉप अन् मोबाईल वर सुरू झाली . आधी आधी खूप मजा वाटली कारण सर्व घरातच रहात होतो . सर्व आपापल्या खोलीत लॅपटॉप अन्, मोबाईल घेऊन बसू लागले .आई आणि काकू पण त्यांच्या मोबाईल वरूनच सर्व कामं करू लागल्या म्हणजे शॉपिंग वगैरे. आजी - आबा आले होते आणि गावी जाणार होते पण ते पण इथेच अडकले . ते दोघं पण आधुनिक विचारांचे असल्या मुळे आधुनिक तंत्र ज्ञानाचा भरपूर वापर करत होते त्यामुळे ते आपापल्या मोबाईल अन् लॅपटॉप मध्ये गुंतले. 
       २/३ महिने झाले . काहीच बदल होत नव्हता उलट सर्वांचा स्क्रीन चा वापर खूपच वाढला . टी वी , मोबाईल, लॅपटॉप , किंडल, टॅब,  प्रत्येकाच्या हातात ह्या पैकी काही ना काही असायचं . दोन्ही दादा  शाळे नंतर मोबाईल गेम खेळू लागले , ताई काही  चित्रकला आणि हस्तकला शिकू लागली, काकू आणि आई यूट्यूब वर पाहून वेगवेगळे पदार्थ करू लागल्या शिवाय त्यांनी ऑनलाईन ट्रेडिंग पण सुरू केलं. बाबा आणि काकांनी पण आपली गिटार आणि वायलिन शिकण्याची आवड पूर्ण करण्या साठी ऑनलाईन वर्ग सुरू केले. 
     म्हणजे एकंदर काय तर सर्व स्क्रीन मध्ये व्यस्त झाले . मी लहान असल्या मुळे मला मोबाईल  फक्त शाळे पुरताच वापरायला मिळत होता आणि तो पण आई चा . मी जाम बोर होत होतो आणि चिडचिड करायचो . 
   एक दिवस आम्ही सर्व संध्याकाळी चहा पिताना गप्पा करत होतो ( तेवढे तरी सर्व एकत्र येत होते) तेव्हां आजीनं एक प्रस्ताव सर्वान समोर ठेवला की शनिवारी किंवा रविवारी जेव्हां तुम्हा सर्वांना वेळ असेल तेव्हां आपण दिवस भर "नॉन स्क्रीन डे" ठेवायचा का ? म्हणजे? !??!सर्वांनी एकदम हल्ला केला . हे तर शक्यच नाही  प्रत्येकानी आपापली कारणे सांगितली. " अरे हो थोडा विचार करा ना , नाही म्हणू नका  करून बघा सर्वांना मज्जा येईल असं आपण काही काही करू. " आजी म्हणाली.  उद्या सांगतो म्हणून सर्व निघून गेले. दुसऱ्या दिवशी बाबा अन् काका म्हणाले रविवारी करू शकतो . मग हळू हळू सगळे तयार झाले. 
        आजी नी सांगितले की स्क्रीन ची पूर्ण सुट्टी राहील फक्त आवश्यक कामा साठी एक दोन फोन चालू राहतील बाकी सर्व बंद करायचे. आणि विशेष म्हणजे सर्वांनी दिवस भर हॉल आणि किचन अन् डायनिंग रूम मधेच राहायचे . मोठी माणसं दुपारी थोड्या वेळ आराम करायला खोलीत जाऊ शकतील बाकी सर्वांनी ज्यास्त वेळ इथेच राहायचं .त्या साठी काय काय करायचं ते तुम्ही सर्व मिळून ठरवा आणि सर्वांनी ते मान्य करायचं.
 मग काय सर्वांच्या मीटिंग स् झाल्या , बरंच काही ठरलं आणि सर्वांनी त्या ठरावाला मान्यता दिली.
   आणि शेवटी तो विशेष दिवस उजाडला . आजीनं सर्वांना हॉल मध्ये बोलाविले आणि सांगितले की ह्या ट्रे मध्ये सर्वांचे मोबाईल फोन आणून ठेवा आत्ता सकाळ चे ७ वाजले आहेत आत्ता पासून उद्या सकाळी ७ वाजे पर्यंत कोणी फोन घ्यायचा नाही. सगळ्यांनी जड मनाने आपले मोबाईल त्या ट्रे मध्ये छान जमवून ठेवले.मला खूप मजा येत होती . आज मी बोर होणार नव्हतो. 
    बाबा आणि काकांनी सांगितले की सर्व मुलं मिळून सकाळ चा चहा आणि नाष्टा तयार करतील . आणि जेवणाचे आम्ही दोघं बघू  म्हणजे आई  काकू अन् आजी ची आज किचन  मधुन सुट्टी . त्यात पण सर्व मुलं पण मदत करतील. आई आणि काकू अगदी खुश झाल्या कारण त्यांना पण आज थोडी विश्रांती मिळणार होती. ताई अन् एका दादा नी मस्त सँडविच बनवले , दुसऱ्या दादा नी झकास पैकी चहा केला. मी चहा नाश्त्याची क्रॉकरी टेबलावर जमवली . मग सर्व गप्पा मारत मारत चहा ची मजा घेऊ लागले   आज सर्वांना भरपूर वेळ होता आणि विशेष म्हणजे कोणाच्या पण हातात स्क्रीन नव्हता. एक दीड तास केव्हां संपला कळलंच नाही . 
    मग आम्ही सर्व मुलं गप्पा करत हॉल मधे पुढचं प्लॅनिंग करत होतो आणि सर्व मोठे अंघोळी वगैरे करायला खोल्यांमध्ये गेले . 
     थोड्या वेळाने आई आणि काकू किचन मध्ये जेवणाच्या तयारीला लागणार तेवध्यात च बाबा आणि काका आले आणि त्यांनी किचन का ताबा घेतला आणि त्यांनी आई अन् काकूला हॉल मध्ये पाठवलं   दीड दोन तासात मस्त पैकी बटाट्याची भाजी ,काकडी ची कोशिंबीर अन् पोळ्या तयार झाल्या   अर्थात आम्ही सर्व मुलांनी पण खूप मदत केली   वेगळ्या स्वादाचे मस्त जेवण होते म्हणून सर्वांनी जेवणावर ताव मारला आणि अश्या प्रकारे प्रसन्न वातावरणात हसत खेळत जेवण झाले.किचन मध्ये खूप पसारा झाला होता म्हणून तेवढं मात्र आई अन् काकू नी पटकन आवरून घेतलं. 
      मग आजी अन् आबा थोड्या वेळ आराम करायला गेले पण आई बाबा आणि काका काकू मात्र आमच्या बरोबर हॉल मधेच थांबले . मग आमच्या प्लॅनिंग प्रमाणे वेगवेगळे खेळ सुरू झाले. कॅरम, बुद्धिबळ , पत्त्यांचे अनेक प्रकारचे खेळ खेळलो तसेच आणखी पण ग्रुप खेळ जसे डम्ब शराडज आणि आजी आबा हॉल मध्ये आल्यावर अंताक्षरी पण खेळलो . 
         खूप खूप मज्जा आली  दिवस संपत आला पण कोणी पण हातात मोबाईल घेतला नाही कोणाला आठवण पण आली नाही. 
          मग रात्री जेवणा साठी आजी ने गरम गरम खिचडी साजुक तूप आणि पापड ह्याचा बेत केला आम्ही सर्व खूप आनंदात जेवलो . मग आबांनी सर्वाची एक सभा घेतली आणि सांगितलं की  प्रत्येकानी सांगायचं की आज कसं वाटलं . सगळ्यांनी हेच सांगितलं की आज खूप आवडलं .आगळा वेगळा दिवस गेला दिवस खूप मोठा वाटला आणि परत नक्कीच " नो स्क्रीन डे," करू आणि नेहमी नेहमी करू.
            असा तो एक विशेष दिवस होता.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू