पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अल्लख निरंजन

अल्लख निरंजन


दत्त माझ्या संकटाला धावले
सुख तयांनी परतुनी ते आणले ||धृ||


नाम जपतो भक्त जेव्हा आतुनी
राहतो आनंद हृदयी व्यापुनी
भाव ओळखले मनीच्या आपले ||१||


नाम दत्ताचे मुखाशी नांदते
भक्त होण्या भाग्य तेव्हा लाभते
मागतो आदेश त्यांनी जाणले ||२||


सोड आता मी पणाला माणसा
का करावा गर्व आणिक लालसा
तू जसा होता तसा तुज पोसले ||३||


काल होते आज नाही राहिले
दत्त पाठीशी उभे ते वाचले
मागतो का वाचण्याचे दाखले ||४||


पूण्य गाठीशी सदा बांधू चला
श्री गुरू दत्ता म्हणू गाऊ चला
बालकाच्या सारखे सांभाळले ||५||


लक्ष दत्ताचे असे भक्तांवरी
थांबले आनंद देण्या मज घरी
इच्छिता अल्लख निरंजन बोलले ||६||


©®सौ.प्रज्ञा कुलकर्णी
#राज्ञी
वसमत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू