पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लठ्ठ लग्नाळू

*लठ्ठ  लग्नाळू**

*ससा रे ससा कापसा जसा*

       -:  स्वरचित वात्रटिका  :-


कसा नि बसा ,आहे ढिम्म जसा ,तिच त्याच्याशी लगीन लागलं .

हळू हळू चाले पोट , गदा गदा हाले ,

नवरदेव  लठ्ठ  मी .


अशी रे कशी काळी म्हैस च  जशी त्याच  तिच्या शी लगीन लागलं

डौल तिचा पहा चाल तिची पहा

जणु हत्तीण वळवळ ली.


मोठे मोठे डोळे नी वटारून पाहे, नवरी ती हँसली ,

वेणी चा शेपटा ,गर गर फिरवे बत्तीशी रे

दिसली .


जाड्या भेंगा चा चष्मा नि भिरी भिरी पाहे ,गम्मत लग्ना ची ,

नाकाचा शेन्डा,बोटाने उडवित

करे चष्मा खाली वरती ,


पाटावर बसाया नवरा धजेना

चार हातांनी बसविलें ,

रुपाया नारळ , ठेवावे कुंठ ते पोटा ने जागा अडविलें .


हातां ना जोडून पूढे करताना पोट आडवे आले .


वर माळा घेऊन नवरा उभा , त्याच्या समोर उभी 

 नवरी ,

गळ्यात माळा,घालावी कशी बरं,दोनदोन ढेरी अडली.


वर जरा झुकला , जरा मागे  हटला ,त्याचा हात च डग -मगला ,

वाके जसा तसा , जणु बैल घाण्या वरचा

अरे ! चष्मा च त्याचा पडला .


कसा नि बसा आहे जोडा त्यांचा ,एक हत्तीणी, दूजा  बैलं ,

शुभ मंगल ,सावधान करा ,आपणा जेवणा ची चंगळ.



सौ सुलोचना बेलापुरकर

       *अपराजिता *

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू