पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फुगे - स्वलिखित बालकथा

सुंदरनगर नावाचं एक गावं असते . ते नावाप्रमाणेच खूप सुंदर असते . त्या गावाच्या सुंदरतेमुळे तिथे पर्यटक येत असतात . तेथील सर्व गावकरी शेतकरी असतात . सर्व गावकरी खूप मेहनती असतात . काहीजण पर्यटनामुळे छोटी - मोठी दुकाने चालवत असतात . यातून सर्व गावकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो . त्या गावात समीर नावाचा एक मुलगा त्याच्या आई - वडिलांसोबत राहत असतो . समीर शाळेत शिकत असतो . तो खूप हुशार मुलगा असतो . शाळेमध्ये तो एक हुशार मुलगा असतो . त्याची आई सावकाराच्या इथे घरकाम करत असते व त्याचे बाबा गावात फुगे विकण्याचे काम करत असतात . त्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो . दिवसेंदिवस गावातील गावकऱ्यांची भरभराट होत असते . सर्व गावकरी आनंदात असतात . हा आनंद साजरा करण्यासाठी गावातील सरपंच एका जत्रेचे आयोजन गावात करतात . जेणेकरून पर्यटक व गावकऱ्यांना आनंद घेता येईल . गावातील गावकऱ्यांनी जत्रेच्या तयारीची सुरुवात केली . जत्रे मध्ये खाऊची , खेळण्यांची दुकाने होती . जत्रेमध्ये मोठे झोपळे , खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुद्धा उपलब्ध होते . 

 

जत्रेच्या बातमीमुळे सर्व गावकरी व पर्यटक आनंदून जातात . सर्वात जास्त आनंद समीरच्या बाबांना होतो . कारण जत्रेमध्ये लहान लहान मुले त्यांच्या कुटुंबासोबत येणार आणि लहान मुलांना फुगे खूप आवडत असतात . त्यामुळे समीरच्या बाबांची चांगलीच कमाई होईल . रात्री समीर त्याच्या बाबांना फुगे फुगवण्यात मदत करतो . त्यानंतर जेवण होते . सर्वजण जेवतात . समीर झोपण्यापूर्वी त्याच्या शाळेची तयारी करतो . दप्तरात वेळापत्रकानुसार वह्या , पुस्तके भरतो . समीर सकाळी उठतो . ब्रश करतो . त्यांनतर अंघोळ करून , कपड्यांना इस्त्री करून घालतो . कपडे घालून झाल्यावर चहा चपाती खातो व डब्यामध्ये सुद्धा चपाती व भाजी भरतो . पाण्याची बॉटल भरून झाल्यावर बॅग मध्ये ठेवून शाळेत निघून जातो . त्याची आई सुद्धा घरकाम करण्यासाठी निघून जाते . सकाळी त्याचे बाबा सुद्धा फुगे विकण्यासाठी निघून जातात . ठरल्याप्रमाणे समीरचे बाबा जत्रेमध्ये फुगे विकण्याचे काम सुरू करतात . रोज समीरच्या बाबांची चांगली कमाई होत असते . समीरचे आईवडील दोघे खूप आनंदीत असतात . रोज त्यांचा हाच दिनक्रम सुरू असतो .

 

 

एके दिवशी समीरचे बाबा जत्रेमध्ये गेले होते . जत्रेमध्ये चालत असताना जत्रेमधील भलामोठा झोपाळा त्यांच्यावर पडतो . त्या झोपळ्यात कोणीही नसते त्यामुळे कोणाचाही हानी होत नाही . पण समीरच्या बाबांचा त्यात मृत्यू होतो . ही बातमी समीरला व त्याच्या आईला कळताच दोघेसुद्धा एकमेकांना मिठी मारून रडू लागलात . समीर शाळा शिकत असतो त्यामुळे त्याच्या शाळेचा खर्च बाबा करत होते . पण आता बाबा नाहीत व त्याच्या आईलासुद्धा कमी पैसे मिळत असतात . म्हणून बाबांचे फुगे विकण्याचे काम आता समीर वरती येऊन पडते .

 

दरदिवशी समीर फुगे विकण्याचे काम करतो . त्यातून त्याच्या शाळेची फी व त्याचा व त्याच्या आईचा उदरनिर्वाह होतो . असेच काही दिवस काम करत असताना , एक साहेब समीरला काम करताना बघतात . ते समीरच्या जवळ येऊन . तू काम का करत आहेस असे विचारतात . समीर त्यांना घडलेली सर्व बातमी सांगतो . ते साहेब त्याला त्याच्या आईला त्यांना भेटायचे आहे असे म्हणतात . समीर त्या साहेबांना आपल्या आईजवळ भेटायला नेतो . ते साहेब समीरच्या आईला म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका . समीरला फुगे विकण्याचे काम करायला नको सांगू मी त्याच्या शाळेचा सर्व खर्च व तुमच्या कुटुंबाचा खर्च करेन . हे ऐकून समीर व त्याची आई त्या साहेबांचे आभार मानते व पूर्वीसारखे समीर व त्याची आई सुखाने राहू लागतात . काहीवर्षाने समीर शिकून एक मोठा साहेब बनतो व ज्या साहेबांनी त्याला इथपर्यंत पोहचवण्यासाठी मदत केली त्यांना शोधून त्यांचे पैसे परत करतो . त्या साहेबांना त्याचा अभिमान वाटतो . समीर सुद्धा एका गरीब , अनाथ मुलाच्या शिक्षणाची व रहाण्याची सोय करतो . गावातील गरीब माणसांना मदत करतो . गावातील गावकऱ्यांसाठी एक विहीर खोदून देतो . गावामध्ये चांगले रस्ते , लाईट आणि दवाखाने निर्माण करतो . जेणेकरून सर्वजण आनंदी असेल आणि त्याच्यावर जे लहानपणी संकट आले होते ते इतरांना येऊ नये यासाठी तो सर्वांना मदत करतो .

 

तात्पर्य - जीवनामध्ये आलेल्या संकटांना आपण बिनधास्तपणे सामोरे गेले पाहिजे .

 

लेखक - © धनराज संदेश गमरे 

 

पत्ता - 304 , सी विंग , श्रीपाल हाऊसिंग सोसायटी , साई बाबा मंदिराजवळ , हेंद्रेपाडा , बदलापूर (पश्चिम) 421 503

 

जिल्हा - ठाणे

 

राज्य - महाराष्ट्र

देश - भारत

महत्वाची माहिती - फुगे - स्वलिखित बालकथा मी स्वतः ( © धनराज संदेश गमरे ) लिहलेली असून चौर्य किंवा अनुवादित नाही . ही बालकथा समीर नावाच्या काल्पनिक पत्रावर आधारित आहे . समीर हा हुशार व मेहनती मुलगा आहे . हे आपल्याला या बालकथेमधून समजून येईल . बालकथा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा . 

धन्यवाद !

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू